उमरग्यात वेश्या व्यवसाय प्रकरणी चार जणांवर कारवाई , पाच महिलांची सुटका
उमरगा - उमरग्यात पुन्हा एकदा वेश्या व्यवसाय उघडकीस आला आहे. चौरस्ता जवळील जकेकूर एमआयडीसीमध्ये लघुउद्योग करण्याऐवजी वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका हॉटेलवर पोलिसांनी छापा मारून मोठी कारवाई केली आहे.
शहरातील जकेकुर एम.आय. डी. सी. येथील रोहन बार ॲन्ड रेस्टॅरंट मध्ये अनैतिक देह व्यापार ( वेश्या व्यवसाय ) केल्याप्रकरणी चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे.
आरोपी नामे- 1) शिलरत्न माधव गायकवाड, वय 22 वर्षे, रा. गुंजोटी, ता. उमरगा , 2) जयदिप सोनकवडे रा. ढेरे गल्ली उमरगा 3) राहुल मल्लीनाथ पुरातले वय 24 वर्षे, 4) अजय ज्ञानेश्वर कांबळे, वय 23 वर्षे, दोघे रा. भिमनगर उमरगा यांनी संगणमत करुन स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी दि.13.09.2023 रोजी 22.45 वा सु जकेकुर एम.आय. डी. सी. येथील रोहन बार ॲन्ड रेस्टॅरंट येथील वरच्या मजल्यावर रुममध्ये पाच महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना ग्राहकांचे मागणी प्रमाणे लैंगीक समागमनाकरीता करीता पराववृत्त करुन त्यांना वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्यावरती उपजिवीका करीत असताना मिळून आले.
यावरुन पोलीसांनी छापा कारवाई करुन यातील पिडीत महिलांची सुटका करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 370,370(अ)(2),सह अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3, 4, 5 अंतर्गत उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
मालक सोडून नोकरावर गुन्हाशहरातील जकेकुर एम.आय. डी. सी. येथील रोहन बार ॲन्ड रेस्टॅरंटवर पोलिसांनी छापा मारून चार जणांवर कारवाई केली असली तरी हॉटेल मालकाला अभय दिले आहे. त्यामुळे मालक आणि पोलीस यांच्यात अर्थपूर्ण बोलणी झाल्याची चर्चा सुरु आहे.