तुळजापुरात बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेणारे चार आरोपी अटकेत

आयसीआयसी बँकैची फसवणूक करणारे गजाआड 
 
s

तुळजापूर : आयसीआयसी बँकेच्या तुळजापूर शाखेत बनावट सोने तारण ठेवून  कर्ज घेणारे चार आरोपीना पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. 

सहा  व्यक्तींनी आठ वेळेस एकुण 564.3 ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे दागिने ऑगस्ट 2021 मध्ये आयसीआयसी बँक शाखा- तुळजापूर येथे तारण ठेउन 17,70,851 ₹ कर्ज घेतले होते. कालांतराने ते सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने बँकेचे शाखा  व्यवस्थापक- सुनिल क्षिरसागर यांनी दि. 26 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो.ठा. येथे गु.र.क्र. 290 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 420, 511, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

             तपासादरम्यान तुळजापूर पोलीस ठाण्याच्या पोनि- श्री. अजिनाथ काशीद, सपोनि- श्री. ज्ञानेश्वर कांबळे, पोहेकॉ- सोनवणे, पोना- यादव, पोकॉ- सावरे, साळुंके, ससाणे, पवार यांच्या पथकाने 1)रशीद अल्लाउद्दीन नदाफ, रा. आरबळी, ता. तुळजापूर 2) सद्दाम नसीर शेख, रा.मोहोळ, जि. सोलापूर 3) कोंडाजी हारुण खुदादे 4) अब्बास राजु पठाण, दोघे रा. इटकळ या चौघांना दि. 7- 11 सप्टेंबर दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणांहुन अटक केले. तसेच कर्जाच्या रकमे पैकी 1,35,100 ₹ नमूद लोकांकडून जप्त करण्यात आली असून अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत असून 3,21,516 ₹ रकमेचा आरोपींनी यापुर्वीच कर्ज भरणा केला आहे.


उस्मानाबादेत फसवणूक 

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील महिला आर्थिक विकास महामंडळाचे लेखाधिकारी- फरहतउल्ला हुसेन यांच्या बँक खात्यातून 1,50,000 ₹ रक्कम कपात झाल्याचा लघु संदेश त्यांना दि. 13 सप्टेंबर रोजी आला. हुसेन यांच्या नकळत त्‍यांच्या खात्यातून कोण्या अज्ञाताने ऑनलाईन पध्दतीने ही रक्कम परस्पर वळवली आहे. अशा मजकुराच्या हुसेन यांनी दि. 14 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web