पाटील तांड्यावर हातभट्टीचा महापूर 

नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई 
 
s

नळदुर्ग  : अक्कलकोट रोडवरील पाटील तांड्यावर हातभट्टीचा महापूर आला होता. नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई करीत हातभट्टी दारु निर्मीती एका इसमास अटक करून  द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट केला आहे. 

नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील सुनिल फुलचंद पवार हे दि. 10.11.2021 रोजी 17.30 वा. सु. पाटील तांडा येथील आपल्या शेतात हातभट्टी दारु निर्मीती करीता गुळ- पाणी मिश्रणाचा एकुण 3,400 लि. आंबवलेला द्रवपदार्थ प्लास्टीकच्या 15 पिंपात व 2 रिकामे पिंपे आणि 20 लि. हातभट्टी दारु बाळगलेले नळदुर्ग पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी हातभट्टी निर्मीतीचा द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट केला व हातभट्टी दारु जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

जुगार विरोधी कारवाई

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील सुमित रामचंद्र बागल हे दि. 09.11.2021 रोजी शहरातील धारासुर मर्दिनी कमानिजवळील पशुखाद्याच्या दुकानात ऑनलाईन मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम असा 13,000 ₹ माल बाळगले असतांना उस्मानाबाद (श.) पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web