उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे पाच गुन्हे 

 
Osmanabad police

उमरगा  : बाबळसुर, ता. उमरगा येथील शेषेराव अर्जुन सुर्यवंशी व बालाजी सुर्यवंशी या पिता- पुत्रांचा गावातील नातेवाईक- संगिता जिवन सुर्यवंशी यांच्याशी पुर्वीच वाद आहे. संगिता सुर्यवंशी या दि. 10.11.2021 रोजी 18.00 वा. सु. बाबळसुर येथील शेतात गेल्या असता नमूद पिता- पुत्रांनी संगीता यांना शेतात आल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन विळा फेकून मारुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच 10- 23.11.2021 दरम्यान संगिता यांची जाऊ- मंदोदरी यांच्या शेतातील सोयाबीनची बनीम व टारपोलीन नमूद दोघांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या संगिता सुर्यवंशी यांनी दि. 02 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 336, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी  : रुईभर, ता. उस्मानाबाद येथील शैलेश बाबासाहेब चव्हाण यांच्या घराच्या भिंतीवरील टारपोलीन दि. 25- 26.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने उचकटून घरात प्रवेश करुन घरातील 12,000 ₹ किंमतीचे सुवर्ण झुमके व एक स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या शैलेश चव्हाण यांनी दि. 02 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील ‘प्रिन्स बिल्डींग मटेरिअल’ या दुकानाचा पत्रा अज्ञात व्यक्तीने दि. 01- 02.12.2021 रोजी कापून दुकानातील वॉल मिक्सर- 36, बिबकॉक- 128, सिंककॉक- 74, पिलरकॉक- 35, वेबिबकॉ- 113, अँगल स्टॉप कॉक- 86, डाय वॉटर- 78 नग असे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या दुकान मालक- ईरफान ईस्माईल शेख, रा. ख्वॉजानगर, उस्मानाबाद यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : अंतरगाव, ता. भुम येथील तात्यासाहेब तुळशीराम गोरे यांच्या ताब्यातील बोलेरो वाहन क्र. एम.एच. 25 आर 1692 हे दि. 01- 02.12.2021 दरम्यानच्या रात्री गावतील ‘शेतकरी कृषी सेवा केंद्र’ या दुकानासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या गोरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : खाजा मैनुद्दीन मुनीर अरब, रा. लोहारा (बु.) यांच्या गट क्र. 182 / 1 मधील शेतातील तुषारसिंचन संचाचे 8 नोजल दि. 14- 15.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या खाजा अरब यांनी दि. 02 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web