उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या पाच घटना 

तुळजापूर, तामलवाडी, जळकोट, उमरगा येथे धाडसी चोरी 
 
Osmanabad police

तुळजापूर : हडको तुळजापूर येथील ज्ञानेश्वर खोले व बिजली शिकारे या दोघांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा दि. 01- 02.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून खोले यांच्या घरातील 7 ग्रॅम वजनाचे सुर्वण दागिने, 40 ग्रॅम चांदीचे दागिने व 4,500 ₹ रोख रक्कम तर शिकारे यांच्या घरातील 11 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, चांदीचे जोडवे व पैंजन व एक स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर खोले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : सोलापूर येथील चालक- विठ्ठल लकडे हे दि. 31.10.2021 रोजी 17.00 वा. सु. माळुंब्रा गावातील रस्त्याने मिनीट्रक चालवत जात होते. यावेळी चार अनोळखी महिलांनी गरोदर महिलेचा बहाना करुन वाहनातून प्रवास करण्याची मदत मागीतली. यावर तीन महिला वाहनाच्या हौद्यात बसल्या तर एक महिला वाहनात चालकाच्या बाजूस बसली. थोडे अंतर गेल्यावर गरोदर महिलेस वाहनाचे हादरे बसत असल्याचा बहाना करुन हौद्यातील महिलांनी चालक- लकडे यांना पाठीमागे बोलावून घेताच चालकाच्या बाजूस बसलेल्या महिलेने चालकाशेजारच्या डिकीतील 60,000 ₹ रक्कम चोरली. अशा मजकुराच्या विठ्ठल लकडे यांनी दि. 02.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत वडगाव (काटी) ग्रामस्थ- महादेव निर्मळ यांच्या शेत विहीरीतील कृष्णा विद्युत पानबुडी पंप दि. 01- 02.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या महादेव निर्मळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : जळकोट, ता. तुळजापूर येथील भिमाशंकर यादगौडा यांनी त्यांची हिरो होंडा पॅशन प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 सी 1913 ही दि. 02.11.2021 रोजी 10.30 ते 13.00 वा. दरम्यान जळकोट शिवारातील आपल्या शेतात लावलेली असता अज्ञात व्यक्तीने ती चोरुन नेली. अशा मजकुराच्या भिमाशंकर यादगौडा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : सोलापूर येथील सुनिल पांढरे यांनी त्यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 13 सीएन 6034 ही दि. 31.10.2021 रोजी 21.00 ते 22.30 वा. दरम्यान लक्ष्मी पाटी येथील मोटार दुरुस्ती दुकानासमोर लावली असता अज्ञात व्यक्तीने ती चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुनिल पांढरे यांनी दि. 02.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web