धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या पाच घटना 

 
crime

वाशी   : चांदवड, ता. भुम येथील- रमल महावीर करगळ, वय 30 वर्ष, यांचे राहते घराचे किचनचा पाठीमागील दरवाजाचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.30.06.2023 रोजी 11.00 ते दि.01.07.2023 रोजी 01.00 वा. सुमारास तोडुन आत प्रवेश करुन कपाटातील  33 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे व रोख रक्कम 14,500 ₹ असा एकुण 68,500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या रमल करगळ यांनी दि.01.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  :आरळी बु, ता. तुळजापूर येथील- अभिमन्यु पारवे, वय 45 वर्ष, यांचे आरळी बु, शिवारात गट नं 318 मधील विहीरीवर असलेली लक्ष्मी मेनोब्लॉक कंपनीची 5 एचपीची विद्युत पंप अंदाजे 10,000 ₹ किंमतीचा, तसेच खंडु बब्रुवान कचरे रा. आरळी बु, यांची किर्लोस्कर कंपनीची 5 एचपी विद्युत पंप अंदाजे 10,000 ₹ किंमतीचा असे एकुण 20,000 ₹ किंमतीचे दोन विद्युत पंप दि. 29.06.2023 रोजी 22.00 ते दि 30.06.2023 रेाजी 08.00 वा. सु. आरळी बु शिवारातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या अभिमन्यु पारवे यांनी दि.01.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : आरणी, ता. उस्मानाबाद येथील- सुशांत सुरेश कुलकर्णी, वय 27 वर्ष, यांचे  आरणी शिवारात गट नं 215 मधील शेतातील सीआरएनटी 5/18 कंपनीची 7.5 एचपी ची विद्युत पंप व क्रॉम्टन कंपनीची 5 एचपी विद्युत पंप अंदाजे 39,000 ₹ किंमतीचे, दोन विद्युत पंप दि. 01.07.2023 रोजी 02.00 ते 06.00 वा. सु. आरणी शिवारातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या सुशांत कुलकर्णी यांनी दि.01.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  :चिंचांली जहा, ता. उमरगा येथील- पार्वती देवराया जमादार, वय 55 वर्ष, यांचे अंदाजे 68,000 ₹ किंमतीचे 17 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे हे एम.ए.टी. मोटारसायकलचे हॅन्डला पर्स अडकुन थांबले होते.  दि.30.06.2023 रोजी 13.30 वा. सु. चिंचोली ज. येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या पार्वती जमादार यांनी दि.01.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग  :जवाहर कॉलेजच्या पाठीमागे, अणदुर येथील- राहुल दत्तात्रय जाधवर, वय 37 वर्ष, यांचे अंदाजे 70,000 ₹ किंमतीचे युनीकॉर्न मोटरसायकल क्र एमएच 13 डीडी 6080 ही दि.29.06.2023 रोजी 23.00 ते दि.30.06.2023 रोजी 06.00 वा. सु. जाधवर यांचे घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या राहुल जाधवर यांनी दि.01.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web