धाराशिव जिल्ह्यात चोरीचे पाच गुन्हे दाखल
नळदुर्ग : फिर्यादी नामे- श्रीशैल प्रभाकर कुरणे, वय 45 वर्षे, रा. निलेगाव, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.28.08.2023 रोजी 23.00 ते दि.29.08.2023 रोजी 06.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन लोखंडी कपाटातील रोख रक्कम 1,50,000₹ व 5 ग्रॅम सोन्याच्या दोन अंगठ्या असा एकुण 1,80,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी श्रीशैले कुरणे यांनी दि.30.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 457,380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे- बसवराज हिरप्पा कुरणे, वय 23 वर्षे रा. निलेगाव, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांची 50,000₹ किंमतीची एच. ऊ. डिलक्स कपंनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एआर 8088 ही दि.28.08.2023 रोजी 22.00 ते दि. 29.08.2023 रोजी 07.30 वा. सु.बसवराज कुरणे यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी बसवराज कुरणे यांनी दि.30.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा :फिर्यादी नामे- बालाजी अंबादास गुंजाळ, वय 38 वर्षे, रा. वांगी बु. ता. भुम जि. उस्मानाबाद यांचे वांगी शिवारातील शेतातील राहते घराच्या जिन्यावरुन अज्ञात व्यक्तीने दि.22.08.2023 रोजी 02.00 ते 02.30 वा. सु. आत प्रवेश करुन घरातील रोख रक्कम 2,00,000₹, एक वन प्लस कंपनीचा मोबाईल व एक विवो कंपनीचा मोबाईल असे दोन मोबाईल असा एकुण 2,30,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी बालाजी गुंजाळ यांनी दि.30.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 457,380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :फिर्यादी नामे- संजय हनुमंत गोफणे, वय 38 वर्षे, रा. सोनेगाव ता. जि. उस्मानाबाद हा.मु. येडशी ता. जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची हिरो कंपनीची काळे रंगाची एच एफ डिलक्स मोटरसायकल क्र एमएच09 इइ 0747 ही दि. 23.08.2023 रोजी 22.00 ते दि.24.08.2023 रोजी 06.00 वा. सु. संजय गोफणे यांचे राहते घराच्या समोरुन चोरुन नेली. तसेच गावातील पोपट बाबुराव गव्हार रा. गव्हारवस्ती येडशी ता. जि. उस्मानाबाद यांचे घरातुन सोन्याचे दहा ग्रॅम वजनाचे बोरमाळ, झुमके व रोख रक्कम 5,000₹ असे एकुण 50,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी संजय गोफणे यांनी दि.30.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 457,380, 379, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : दि.30.08.2023 रोजी 03.30 वा. सु. कळंब शहरामधील ढोकी कळंब रोडवर जंत्रे कॉमृपलेक्स मध्ये गाळा नं 05 कळंब येथील ए.टी.एम मशीनच्या गाळ्यामध्ये प्रवेश करुन मशीनला एक वायररोप चा फासा टाकुन त्यास कशाने तरी जोरात ओढून मशीन गाळ्याचे बाहेर काढून स्टेट बॅक ऑफ इंडियाचे ए. टी. एम मशीन जिचा ATM ID T1NH020039022 असा असणारी जिच्यामध्ये 29,91,500₹ दराच्या 5,983 चालनी नोटा मशीनसह मशीनची किंमत 3,25,000₹ असा एकुण 33,16,500₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे अभय बाळासाहेब साळुंके, वय 34 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी हिताची पेमेंन्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लि. चेन्नई रा. श्री. स्वामी समर्थ नगर जुना एम. आय. डी. सी. रोड लातुर यांनी दि.30.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 380,461अन्वये गुन्हा नोंदवला आहे.