धाराशिव जिल्ह्यात चोरीचे पाच गुन्हे दाखल
मुरुम : फिर्यादी नामे-विजयकुमार माधवराव इंगळे, वय 50 वर्षे, रा. किसान चौक, मुरुम ता. उमरगा जि. उस्मानाबाद, यांचे मुरुम शिवारातील शेतातील गोठ्यात बांधलेल्या तीन शेळ्या व एक बोकड अंदाजे 80,000 ₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या विजयकुमार इंगळे यांनी दि.14.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फिर्यादी नामे-लालसिंह बाबुसिंह रावत वय 38 वर्षे, धंदा चालक, रा. हिंगोली, ता. भुम जि. राजमुद्रा, राज्य राजस्थान यांचे दि. 24.06.2023 रोजी 03.30 ते 04.30 वा. सु. पारगाव शिवारात उभे केलेल्या कंटेनर क्र एच आर. 47 ई 2754 मधील अंदाजे 15,312 ₹ किंमतीचे एन लीक लॉजीस्टीक्स कंपनीचे बॅनको कंपनीचे रेडीएटरचे चार बॉक्स अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या लालसिंह रावत कंनेटर चालक यांनी दि.14.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : फिर्यादी नामे-धनराज धर्मराज खोत वय 45 वर्षे, रा. गोवर्धनवाडी, ता.जि. उस्मानाबाद यांच्या आई नामे सिताबाई धर्मराज खोत वय 70 वर्षे या दि.13.07.2023 रोजी 16.00 वा. सु. तेर बसस्थानक येथे ढोकी जाणारे बस मध्ये चढत असताना त्यांचे गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे अंदाजे 15,000 ₹ किंमतीचे सुवर्ण दागिणे हे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशा मजकुराच्या धनराज खोत यांनी दि.14.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो.ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : फिर्यादी नामे-नागनाथसिंग विश्वंभर ठाकुर, वय 64 वर्षे, रा. ताकविकी, ता. जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 3,220 ₹ किंमतीचे 76 मीटर सर्विस वायर हे दि.05.07.2023 रोजी 14.00 ते दि.09.07.2023 रोजी 05.00 वा. सु. फियादी यांचे शेतात ताकविकी शिवारात अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या नागनाथसिंग ठाकुर यांनी दि.14.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो.ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : आरोपी नामे- 1)विकास बाळासाहेब भोसले, वय 22 वर्षे, रा. राउत नगर अकलूज ता. माळसिरस जि. सोलापूर 2)निखील ज्ञानेश्वर धोत्रे, वय 21 रा. विजय चौक लोणार गल्ली अकलूज ता. जि. सदर यांनी दि.17.07.2023 रोजी सांयकाळी 17.45 वा. सु सोनारी ते परंडा रोडवरील बांधकामावरुन मॉजे खानापूर येथुन अंदाजे 4,000₹ किंमतीची सळईचे 70 ते 80 तुकडे चोरुन नेले होते. अशा मजकुराच्या शंकर साहेबा गटकुळ यांनी दि.14.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. वरील नमुद आरोपीनां परंडा पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करती आहेत.