न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद : विक्रम दिनकर गरड, वय 34 वर्षे, रा. खेड, ता. उस्मानाबाद (ह.मु. उस्मानाबाद) हे व्यक्तीगत बंधपत्रावर न्यायालयातून जामीन मुक्त झाले होते. परंतु ते न्यायालयीन सुनावनीस वेळोवेळी गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुध्द सम्नस व वॉरन्ट काढले होते. अशा प्रकारे त्यांनी जाणीवपुर्वक न्यायालयात गैरहजर राहुन भा.दं.सं. कलम- 229 (अ) चे उल्लंघन केले. यावरुन पोना- पांडुरंग बोचरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो.ठा. येथे 22.01.2022 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

लैंगिक अत्याचार

उस्मानाबाद  : एका तरुणाने गावातीलच एका 17 वर्षीय तरुणीस (नाव- गाव गोपनीय) लग्नाचे आमिष दाखवून जानेवारी- 2021 पासून आपल्या घरात डांबून ठेउन आज पावेतो तीच्यावर अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी लैंगीक अत्याचार केले. अशा मजकुराच्या पिडीत मुलीने दि. 22.01.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 342, 506 आणि पोक्सो कायदा कलम- 4, 8, 12 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 चोरी

तुळजापूर : तुळजापूर येथील अतुल धोंडीराम साठे यांच्या ‘मातोश्री’ या दुकानाचा पाठीमागील बाजूचा पत्रा दि. 21- 22.01.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने कापून दुकानात प्रवेश करुन आतील विद्युत मोटार, तांबा धातु तार व इत्यादी साहित्य असे एकुण 1,08,595 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या अतुल साठे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web