उस्मानाबाद जिल्ह्यात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल 

 
Osmanabad police

उस्मानाबाद : एका गावातील 45 वर्षीय विवाहीत महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 15 ऑक्टोबर रोजी 17.00 वा. सु. तीच्या घरात एकटी असल्याची संधी साधून गावातीच एका पुरुषाने तीच्या घरात गुपचूपपने शिरुन तीच्या सोबत लगट करुन तसेच अश्लील कृत्य करुन तीचा विनयभंग केला. तसेच तीला ठार मारण्याची धमकी देउन काठीने मारहान केली. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 354, 294, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

परंडा  : लोहारा, ता. परंडा येथील जयवंत छगन दबडे, मनोज नागनाथ शिंगनाथ या दोघांनी जुन्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन दि. 15 ऑक्टोबर रोजी 18.30 वा. सु. लोहारा येथे गावकरी- सिध्देश्वर अरुण मिसाळ यांना शिवीगाळ करुन करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मोटारसायकलच्या चावीने उजव्या भुवईवर मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या सिध्देश्वर मिसाळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य विरोधी कारवाई

मुरुम  : दिलीप धर्मा आडे, रा. भोसगा तांडा, ता. लोहारा हे दि. 15 ऑक्टोबर रोजी आपल्या राहत्या घरासमोर देशी दारुच्या 07 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना मुरुम पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web