दाळींबमध्ये अवैध गुटखा बाळगला गुन्हा दाखल
मुरुम : दाळींब, ता. उमरगा ग्रामस्थ- शांत अशोक मिटकरी हे त्यांच्या दाळींब येथील मिटकरी ट्रेडर्स या दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ गुटखा व पानमसाला असा 54,600 ₹ किंमतीचा अन्नपदार्थ बाळगलेले असतांना मुरुम पोलीसांना दि. 06.11.2021 रोजी 19.30 वा. सु. आढळले. यावरुन मुरुम पो.ठा. चे पोलीस कॉन्स्टेबल- मारुती मडोळे यांनी सरमारतर्फे दिलेल्या प्रथम खबेरवरुन भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
चोरीच्या तीन घटना
तामलवाडी : गंजेवाडी, ता. तुळजापूर येथील साखरबाई धोंडीबा डोलारे व वसंत मारुती मोरे यांच्या घराचे कुलूप दि. 05- 06.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून डोलारे यांच्या घरात प्रवेश करुन घरातील 17 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, 30 ग्रॅम चांदीचे दागिने व एक एलईडी टीव्ही आणि मोरे यांच्या घरातील 10 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 20,000 ₹ रक्कम चोरुन नेली.
दुसऱ्या घटनेत काटी, ता. तुळजापूर येथील आदील महमुद काझी हे दि. 05- 06.11.2021 दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरात झोपलेले असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या वाड्याच्या भिंतीवरुन आत उडी मारुन घरातील 19 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व दोन स्मार्टफोन चोरुन नेले.
अशा मजकुराच्या साखरबाई डोलारे व आदील काझी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
उमरगा : उमरगा येथील शिवशंभो प्रेमनाथ सुरवसे हे दि. 05.11.2021 रोजी 21.30 वा. सु. जकेकुर शिवारातील बिरुदेव मंदीर येथील यात्रेत असतांना गर्दीचा फायदा घेउन कवठा ग्रामस्थ- आकाश बाळु पवार यांनी शिवशंभो यांच्या विजारीच्या पाठीमागील खिशातील 1,300 ₹ व कागदपत्रे असलेले पॉकेट चोरले. अशा मजकुराच्या शिवशंभो सुरवसे यांनी दि. 06.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
भंडारी येथे अपघात
तुळजापूर : चालक- सोमनाथ धनराज भद्रे, रा. भंडारी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 31.10.2021 रोजी 14.00 वा. सु. काक्रंबा शिवारातील रस्त्यावर स्कॉर्पिओ क्र. एम.एच. 42 एएच 2296 हे निष्काळजीपने चालवून मोटारसायकल क्र. एम.एच. 13 बीई 8979 ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात मो.सा. चालक- पांडूरंग दरगो दळवे, रा. काक्रंबा हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या पांडुरंग यांचा भाऊ- गजेंद्र दळवे यांनी दि. 06.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.