प्रतिबंधीत अन्नपदार्थ गुटखा वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उमरगा  : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांचे पथक दि. 11 ऑक्टोबर रोजी 18.00 वा. सु. जेकेकुर ते चौरस्ता गस्तीवर होते. यावेळी बोलेरो वाहन क्र. एम.एच. 25 एजे 1750 हा मागील हौद टारपोलीनने बंद असलेल्या अवस्थेत जकेकुर दिशेने जात असलेला आढळला. पथकास संशय आल्याने वानास हटकून तपासणी केली असता कनगरा, ता. उस्मानाबाद येथील प्रशांत पांडुरंग टेळे व लोहारा येथील आप्पा विजय मोरे हे दोघे नमूद बोलेरो वाहनातून एकुण 24 पोत्यांत गुटखा व तत्सम पदार्थ असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ अवैधरीत्या वाहून नेत असतांना पथकास आढळले. यावरुन पोउपनि- श्री. सदानंद भुजबळ यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरीचे दोन गुन्हे दाखल 

उस्मानाबाद  : भागवत गाडे, रा. प्रमिलानगर, उस्मानाबाद यांनी त्यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 039 ही दि. 11 ऑक्टोबर 24.00 वा. सु. त्यांच्या घरासमोर लावली आसता दुसऱ्या दिवशी सकाळी लावल्या जागी न आढळल्याने अज्ञाताने ती चोरुन नेल्याचे समजले. अशा मजकुराच्या भागवत गाडे यांनी दि. 12 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : मुक्ता बागल, र सांगवी (मा.), ता. तुळजापूर यांच्या शेतातील सोयाबीन गावकरी- गणेश भोसले, संजय भोसले, कांचन भोसले हे तीघे चोरुन नेत असतांना मुक्ता बागल यांचा मुलगा- मयुर याने त्यांना विरोध केला असता नमूद तीघांनी लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच कांचन यांनी मयुर यास विळ्याने मारहान केली. अशा मजकुराच्या मुक्ता बागल यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 393, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web