अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उमरगा : तलमोड शिवारातील रस्त्यावर उमरगा पोलीसांचे पथक दि. 24.12.2021 रोजी 14.40 वा. गस्त करत होते. यावेळी फरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे येथील लक्ष्मण रोहिदास राउत हे मिनी ट्रक वाहन क्र. एम.एच. 24 जे 7456 मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ असा 22,07,952 ₹ किंमतीचा अन्नपदार्थ वाहून नेत असतांना आढळले. यावरुन उमरगा पो.ठा. चे पोलीस अंमलदार- सिध्देश्वर उंबरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188,272, 273 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरीची दोन गुन्हे 

उस्मानाबाद  : वानेवाडी, ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- तुकाराम अजिनाथ कदम यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 झेड 0083 ही दि. 24.12.2021 रोजी 11.30 ते 13.00 वा. दरम्यान उस्मानाबाद न्यायालयाच्या समोरील रस्त्यावरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या तुकाराम कदम यांनी दि. 25 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अंबी  : मुगाव, ता. परंडा येथील कांतीलाल विलास जगताप यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 4465 ही दि. 23- 24.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या कांतीलाल जगताप यांनी दि. 25 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web