जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

भूम : भूम  पोलीस ठाण्याचे पथक दि. 07.11.2021 रोजी 04.30 वा. सु. भुम येथे रात्रगस्तीस असताना 1)इफ्तकार फैयाज कुरेशी 2)अकबर कुरेशी, दोघे रा. पापनस, ता. माढा, जि. सोलापूर 3)जलील कुरेशी, रा. उस्मानाबाद हे तीघे पिकअप वाहन क्र. एम.एच. 45 एएफ 1824 मध्ये 3 खोंड व 4 कालवड असे 7 जनावरे दाटीवाटीने, निर्दयतेने भरुन कत्तल करण्याच्यासाठी वाहुन नेत असतांना आढळले. यावरुन भुम पो.ठा. चे पोलीस हेडकॉन्स्टेबल- प्रदिप वाघमारे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन प्राण्यांचे परिवहन कायदा कलम- 47, 54, 56 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण कायदा कलम- 11, 5, 6, 9 सह प्राण्यांचा छळास प्रतिबंध अधिनियम कलम- 11 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई

उस्मानाबाद -  पोलीस दलातर्फे दि. 07 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी महत्वाच्या रस्त्यांवर मोटार वाहन कायदा- नियम भंग करणाऱ्यांवर एकुण 310 कारवाया करुन 77,100 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

From around the web