सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल
कळंब : शिराढोन, ता. कळंब येथील ग्रामस्थ- श्याम ज्ञानोबा गाडे यांनी दि. 30.01.2022 रोजी 04.15 वा. सु. कळंब येथील बस स्थानकातील वाहतुक नियंत्रक कक्षाच्या दरवाजाची काच नुकसान करण्याच्या उद्देशाने फोडून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले आहे. यावरुन वाहतुक नियंत्रक कक्षात कर्तव्यास असलेले गोविंद जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 427 सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम- 3 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
मुरुम : आलुर, ता. उमरगा येथील ग्रामस्थ- शानुबाई वसंत राठोड, वय 50 वर्षे यांनी दि. 29.01.2022 रोजी 15.00 वा. सु. गावातीलच एका शेतात गुरे चरण्यास सोडली होती. यावेळी त्या गुरांतील म्हशीचे रेडकू शेजारील महेश शंकर देशेट्टे यांच्या शेतात गेल्याने देशेट्टे यांनी शानुबाई राठोड यांना शिवीगाळ करुन, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शानुबाई राठोड यांनी दि. 30.01.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : हडको, तुळजापूर येथील गोविंद म्हेत्रे यांसह त्यांची मुले- समर्थ व संकेत या तीघांनी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन दि. 29.01.2022 रोजी 13.30 वा. सु. तिर्थ (खुर्द), ता. तुळजापूर येथील अल्लादीन गनी शेख यांना तुळजापूर येथील जुन्या बस स्थानकाजवळ शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अल्लादीन शेख यांनी दि. 30.01.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.