अणदूर - दारू बाळगली म्हणून मधुकर चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : ‍अवैध मद्य विक्री विरोधी उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी काल दि. 06 ऑक्टोबर रोजी 8 ठिकाणी छापे मारुन देशी दारुच्या एकुण 225 बाटल्या मद्य, 390 लि. गावठी मद्य जप्त करुन गावठी मद्य निर्मीतीचा 210 लि. द्रवपदार्थ पोलीसांनी जागीच ओतून नष्ट करुन संबंधीत 8 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध काद्यांतर्गत खालील प्रमाणे 8 गुन्हे नोंदवले आहेत.

१) नळदुर्ग पो. ठा. च्या पथकाने अणदुर येथे छापा टाकाला असता ग्रामस्थ- मधुकर देवराव चव्हाण हे आपल्या राहत्या घरासमोर 10 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.

२) बेंबळी पो. ठा. च्या पथकाने बेंबळी येथे झापा टाकाला असता ग्रामस्थ- सुमण काळे या राहत्या घरासमोर 10 लि. गावठी दारु बाळगलेल्या तर दुसऱ्या घटनेत रुईभर येथी छाप्यात ग्रामस्थ- प्रविण शेरखाने हे रुईभर शिवारात देशी दारुच्या 10 बाटल्या बाळगलेले असतांना आढळले.

३) भुम पो. ठा. च्या पथकाने पारधी पिढी, भुम येथे दोन छापे टाकले असता वस्तीवरील- लता काळे व मिरा काळे या दोघी आपापल्या घरासमोर अनुक्रमे गावठी दारु निर्मीतीचा 210 लि. द्रवपदार्थ व 370 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.

४) अंबी पो. ठा. च्या पथकाने तिंत्रज येथे छापा टाकला असता ग्रामस्थ- शहाजी मसू पवार हे आपल्या घरासमोर देशी दारुच्या 13 बाटल्या बाळगलेले आढळले.

५) परंडा पो. ठा. च्या पथकाने परंडा शहरात छापा टाकाला असता दर्गा रोड, परंडा येथील- शब्बीर शेख हे परंडा टपाल कार्यालयाजवळ देशी दारुच्या 10 बाटल्या बाळगलेले आढळले.

d

६) स्थानिक गुन्हे शाख्येच्या पथकाने येडशी येथील सुरज गणपत पवार यांच्या ताब्यातून 4 खोक्यात असलेल्या एकुण देशी दारुच्या 192 बाटल्या जप्त करुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web