उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी हाणामाऱ्या 

 
Osmanabad police

तुळजापूर  : तुळजापूर तालुक्यातील शिराढोण  ग्रामस्थ- लखन पवार, महेंद्र मुरकुटे, सुभाष सोनवणे यांसह 11 व्यक्तींच्या गटाचा गावकरी- इंद्रजीत वाघ, सुधीर सोनवणे, जिवन वाघ यांसह 12 व्यक्तींच्या गटाशी राजकीय वैमनस्यातून दि. 23.12.2021 रोजी 18.30 ते 19.00 वा. दरम्यान गावातील लाटे दुकानासमोर हानामाऱ्या झाल्या. यात दोन्ही गटांती स्त्री- पुरुषांनी परस्परविरोधी गटांतील स्त्री- पुरुषांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, कोयता, सत्तुर, लोखंडी गज, काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी‍ दिली. अशा मजकुराच्या लक्ष्मण पवार व इंद्रजीत वाघ यांनी दि. 24 डिसेंबर रोजी परस्परविरोधी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 307, 324, 323, 504, 506 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 
कळंब : शेतात पिकअप वाहन घुसवल्याच्या कारणावरुन ईटकुर, ता. कळंब येथील किरण गोविंद गंभीरे व शोभा गंभीरे यांनी दि. 24.12.2021 रोजी 16.30 वा. सु. ईटकुर येथील शिवारात भाऊबंद- भारत पांडुरंग गंभीरे यांना शिवीगाळ करुन, अंगावर चटणी टाकली. तसेच खोऱ्याच्या दांड्याने, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी‍ दिली. यावेळी भारत यांच्या बचावास पुढे सरसावलेल्या त्यांच्या चुलत्यासही नमूद दोघांनी मारहान करुन जखमी केले व भारत यांच्या पिकअपची समोरील काच फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या भारत गंभीरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 427, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

उस्मानाबाद  : परंडा तालुक्यातील एका 17 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) दि. 22- 23.12.2021 दरम्यानच्या रात्री तीच्या घरातून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले. अशा मजकुराच्या मुलीच्या पित्याने दि. 24 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                         

From around the web