उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी हाणामाऱ्या
ढोकी : कोंड, ता. उस्मानाबाद येथील पिंटु गंपू भोसले हे दि. 05.01.2022 रोजी 15.00 वा. सु. ग्रामस्थ- सुनिता भोसले यांच्या शेताच्या बांधावरुन ट्रॅक्टर घेउन जात होते. यावेळी ट्रॅक्टर बांधावरुन नेन्यास सुनिता यांनी पिंटु यांस आडकाठी केली असता पिंटु यांसह पांडुरंग व स्वाती भासले अशा तीघांनी सुनिता यांसह त्यांचा मुलगा- तानाजी यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुनिता भोसले यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत म्होतरवाडी, ता. उस्मानाबाद येथील श्रीमंत श्रीहरी चव्हाण यांनी शेतजमीन वाटणीच्या कारणावरुन दि. 05.01.2022 रोजी भाऊबंद- ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या घरासमोर जाउन ज्ञानेश्वर यांसह त्यांचे पिता- जालिंदर शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ज्ञानेश्वर यांच्या डाव्या हातावर चाकूने वार करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : केशेगाव शिवारातील डॉ. नितीन ढेपे यांच्या गट क्र. 211 मधील शेतात ग्रामस्थ- लक्ष्मण नागनाथ क्षिरसागर यांनी दि. 04.01.2022 रोजी 14.30 वा. सु. जाउन शेतातील गडी- रविंद्र शिवाजी माळगे यांना, “या शेतात काम करायचे असेल तर एकतर मला पैसे द्या, नाहीतर 20 एकर जमीन माझ्या नावावर करा, नाहीतर मी तुमच्यावर ॲट्रॉसिटीची केस करेन मग ती तुला लय महागात पडेल.” असे धमकावले. तसेच शेतातील दुसरे व्यक्ती- नागेश शिरुरे यांना खुर्चीने मारहान करुन जखमी केले आणि शेतातील कुंपनाचे सिमेंटचे 150 पोल तोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या शेत गडी- रविंद्र माळगे यांनी दि. 05 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 384, 324, 506, 434, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : हासेगाव (के.), ता. कळंब येथील बालाजी रामलिंग यादव यांसह त्यांची दोन मुले- कृष्णा व सागर यांनी शेतातील पिकास पाणी देण्याच्या कारणावरुन दि. 05.01.2022 रोजी 19.00 वा. सु. हासेगाव शिवारात भाऊबंद- दत्तात्रय रामलिंग यादव यांना शिवीगाळ केली. यावेळी बालाजी यादव यांनी दत्तात्रय यांच्या डोक्यात विळ्याने वार करुन त्यांना जखमी केले. यावेळी दत्तात्रय यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या पत्नीसही नमूद तीघांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दत्तात्रय यादव यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.