तुळजापूर, तांबेवाडी, चिंचपूर येथे हाणामारी
परंडा : तांबेवाडी, ता. भुम ग्रामस्थ- दत्तात्रय मच्छींद्र निकम यांचा गावकरी- राहुल दत्तु हांगे, दत्तु हांगे, उषाबाई हांगे यांच्याशी शेतातील पाणी सोडण्याच्या कारणावरुन दि. 30.11.2021 रोजी 10.30 वा. सु. तांबेवाडी येथे हानामाऱ्या झाल्या. यात हांगे कुटूंबीयांनी दत्तात्रय निकम यांना शिवीगाळ करुन, टामीने डोक्यात मारुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. तर दत्तात्रय निकम यांनी राहुल हांगे यांच्या अपंगत्वास हिनवून शिवीगाळ करुन, टामीने डोक्यात वार करुन राहुल यांना जखमी केले. अशा मजकुराच्या दत्तात्रय निकम यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तर राहुल हांगे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504 सह अपंग अधिनियम कलम- 92 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : वेताळनगर, तुळजापूर येथील नुरजहाँ आशपाक बागवान यांसह त्यांच्या कुटूंबातील तब्बु, आशपाक, मुस्ताक यांचा गल्लीतीलच नातेवाईक- ईरफाना अमिर बागवान यांसह त्यांच्या कुटूंबातील शरीफा, मिनाज, जावेद यांच्याशी घरासमोर पाणी टाकणे, नालीच्या पाण्याच्या कारणावरुन दि. 30.11.2021 रोजी 10.00 वा. सु. राहत्या गल्लीत हानामाऱ्या झाल्या. यात दोन्ही कुटूंबीयांनी परस्परविरोधी कुटूंबातील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळई, फरशी, विटाने मारहान करुन जखमी कले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नुरजहाँ बागवान व ईरफाना बागवान यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
अंबी : चिंचपूर (बु.), ता. परंडा येथील योगीराज आण्णा गायकवाड यांसह त्यांची मुले- मंगेश व ऋषी यांनी जुना वाद उकरुन काढून दि. 28.11.2021 रोजी ग्रामस्थ- बुवासाहेब शहाजी देवकर यांना त्यांच्या शेतात व घरासमोरील रस्त्यावर आडवून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी नळीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बुवासाहेब देवकर यांनी दि. 30 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 341, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.