उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी हाणामारी 

 
Osmanabad police

मुरुम  : आलुर, ता. उमरगा येथील कलाप्पा राठोड, सुनिता राठोड, पंडीत राठोड, शुभम राठोड, शिवाजी राठोड, सुनिता शिवाजी राठोड, सागर राठोड या सर्वांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 17.01.2022 रोजी 18.00 वा. सु. स्वामीनाथ व्यंकट राठोड यांसह त्यांची आई काशीबाई यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लोखंडी गज, वीट, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. यावेळी स्वामीनाथ यांचा भ्रमणध्वनी कलाप्पा राठोड यांनी जमीनीवर आदळून फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या स्वामीनाथ राठोड यांनी दि. 18 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 143, 147, 149, 427, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा : हिप्परगा (रवा), ता. लोहारा येथील खंडु काशिनाथ राठोड यांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 02.01.2022 रोजी 20.00 वा. सु. संजय ज्ञानोबा राठोड, वय 35 वर्षे यांना त्यांच्या घरासमोर ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गज डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या संजय राठोड यांनी दि. 18 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 336 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील समदानी बाडेवाले व शफीक बाडेवाले हे दोघे पिता- पुत्र दि. 14.01.2022 रोजी 11.30 वा. सु. नळदुर्ग गट क्र. 202 (क) मधील शेतात काम करत होते. यावेळी अब्दुल बसी अब्दुलगनी बाडेवाले व समीन बाडेवाले या दोघा पिता- पुत्रांनी जुन्या वादावरुन समदानी यांसह त्यांचा मुलगा- शफीक यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, खोऱ्याच्या दांड्याने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या शफीक बाडेवाले यांनी दि. 18 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

फौजदारीपात्र न्यासभंग

तुळजापूर  : बाळापुर, ता. धार्माबाद, जि. नांदेड येथील पायोनियर डिस्टीलरीज मध्ये उत्पादीत मॅकडॉल क्र. 1 या मद्याची एकुण 1,100 खोकी कोल्हापूर येथील वितरकास पुरवठा करण्यासाठी ‘नांदेड ट्रान्सपोर्ट’चे मालक नाफे काजी, रा. देगलुर यांसह चालक- शेख जुनेद शेख महम्मद व मुखेड येथील रमेश भारत खरकाडे यांच्या ताब्यात दि. 11.01.2022 रोजी 11.00 वा. देण्यात आला होता. परंतू नमूद लोकांनी तो माल संबंधीतांना वितरीत न करता मालातील मद्याची काही खोकी परस्पर विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने इतर वाहनात ठेवला. तर उर्वरीत खोक्यांसह ट्रक तुळजापूर तालुक्यातील पाचुंदा तलावात दि. 17 जानेवारी रोजी पलटवून मालाचे आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या वाहतूक ठेकेदार- अजय मनोकाणीका तिवारी, रा. धर्माबाद, जि. नांदेड यांनी दि. 18 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 407, 427, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web