पाडोळी, सुरतगांव, तुगाव येथे हाणामारी 

 
Osmanabad police

बेंबळी  : पाडोळी (आ.), ता. उस्मानाबाद येथील कांबळे कुटूंबातील हणुमंत, तुकाराम, प्रिती, महादेव, लक्ष्मी यांचा गल्लीतील- मिसाळ कुटूंबातील राम, आशा, प्रभावती, रेखा यांसह आकांक्षा कांबळे, सागर कांबळे यांच्याशी जुन्या भांडणावरुन दि. 06.11.2021 रोजी 16.00 वा. सु. राहत्या गल्लीत वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन नमूद दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी नळी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या हणुमंत कांबळे व राम मिसाळ यांनी दि. 07.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 149 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

तामलवाडी  : सुरतगांव, ता. तुळजापूर येथील नवनाथ सुरते, राजेंद्र सुरते, सुरज सुरते, विलास सुरते यांसह मनोज गायकवाड, रतन गायकवाड, दोघे रा. सोलापूर यांनी त्यांच्या नातेवाईकांस शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन दि. 07.11.2021 रोजी 15.00 वा. सु. सुरतगांव ग्रामस्थ- अक्षय भोसले यांना त्यांच्या राहत्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केली. यावेळी अक्षय यांच्या बचावास त्यांचा भाऊ- लखन व मेव्हनी आले असता त्यांसही नमूद लोकांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या लखन भोसले यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : तुगाव, ता. उस्मानाबाद येथील किशोर शेंडगे, अशोक शेंडगे, प्रशांत शेंडगे, शरद शेंडगे, श्रीराम शेंडगे या सर्वांचा व्हॉट्सॲप गटात नवीन सदस्य जोडण्याच्या कारणावरुन दि. 07.11.2021 रोजी 15.00 वा. सु. शेंडगे गल्लीत ग्रामस्थ- रंजीत अशोक लोमटे यांच्या सोबत वाद झाला. यात नमूद शेंडगे कुटूंबीयांनी रंजीत लोमटे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. अशा मजकुराच्या रंजीत यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                       

From around the web