उस्मानाबाद, कळंब, रांजणी येथे हाणामारी 

 
Osmanabad police

उस्मानाबाद: आकाश जाधव, लिंबराज डुकरे, किशोर डुकरे, युवराज डुकरे, शाम भोसले, सर्व रा. भवानी चौक, उस्मानाबाद या पाच जणांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 03 सप्टेंबर रोजी 16.30 वा. सु. उस्मानाबाद येथील आर्या रेस्टॉरन्टसमोर अजय अशोक मारुडा व पंकज बनसोडे, दोघे रा. पापनाशनगर, उस्मानाबाद यांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अजय मारुडा यांनी दि. 04 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


कळंब  : भोई गल्ली, कळंब येथील मिनाक्षी बाबासाहेब हारकर या दि. 04 सप्टेंबर रोजी 15.00 वा. सु. गल्लीतीलच नातेवाईक- सुमनबाई हारकर यांच्या घरी बसल्या होत्या. दरम्यान शेतजमीन वाटणीच्या विषयावरुन रेश्मा व अतुल हारकर या दोघा पती- पत्नींसह सापनाई येथील हरीश्चंद्र दोडके यांनी मिनाक्षी यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व अतुल यांनी मिनाक्षी यांच्या हातास चावा घेउन त्यांना जखमी केले. यावेळी मिनाक्षी यांच्या बचावास आलेले त्यांचे पती- बाबासाहेब व सासु यांनाही नमूद तीघांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मिनाक्षी हारकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


शिराढोण  : मारुती काकडे, रा. रांजणी, ता. कळंब हे त्यांच्या पत्नीसह दि. 03 सप्टेंबर रोजी 13.30 वा. सु. आपल्या घरात होते. यावेळी ग्रामस्थ- राहुल पवार, पवान पवार, भैया पवार या तीघांनी संगणमताने काकडे यांच्या घरात घुसून काकडे यांच्या मुला सोबतच्या पुर्वीच्या वादावरुन मारुती काकडे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मारुती काकडे यांनी दि. 04 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 

From around the web