उस्मानाबाद आणि नळदुर्ग येथे हाणामारी 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : अनिल सुखदेव गरड, रा. पिंपरी, ता. उस्मानाबाद हे दि. 11 ऑक्टोबर रोजी 16.00 वा. सु. उस्मानाबाद येथील आयसीआयसीआय बँक शाखेत दैनंदीन कामकाज करत होते. दरम्यान अनोळखी दोन पुरुषांनी गरड यांना बँकेबाहेर बोलावून लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अनिल गरड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : लक्ष्मण बाबु राठोड, रा. नागझरी तांडा, गंधोरा हे दि. 11 ऑक्टोबर रोजी 06.30 वा. सु. आपल्या घरात होते. यावेळी गावकरी- धनाजी राठोड, अनिल राठोड, मोहन राठोड, चंद्रकांत राठोड या चौघांनी आर्थिक व्यवहराच्या कारणावरुन लक्ष्मण राठोड यांच्या घरासमोर जाउन शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यावेळी लक्ष्मण राठोन यांनी नमूद चौघांस समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी लक्ष्मण यांसह त्यांच्या बहिणीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या लक्ष्मण राठोड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबादेत दोन अपघात 

उस्मानाबाद : हनुमंत महारुद्र भारती, रा. चिखली, ता. उस्मानाबाद हे दि. 28.09.2021 रोजी 17.00 वा. सु. ख्वॉजानगर, उस्मानाबाद येथील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने डंपर क्र. एम.एच. 25 यु 9877 हा निष्काळजीपने चालवून हनुमंत भारती यांच्या मो.सा. ला समोरुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या हनुमंत भारती यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत अज्ञात चालकाने दि. 10 ऑक्टोबर रोजी 13.00 वा. सु. कुरणेनगर, उस्मानाबाद येथील रस्त्यावर मिनी ट्रक क्र. एम.एच. 04 डीएस 8706 हा निष्काळजीपने चालवून समोरुन येणाऱ्या मोटारसायकल क्र. एम.एच. 13 एव्ही 6607 ला धडक दिली. या अपघातात मो.सा. चालक- अजय संजय जेडे, रा. उस्मानाबाद यांसह मो.सा. वर पाठीमागे बसलेला त्यांचा मावस भाऊ हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या अजय जेडे यांनी दि. 11 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web