उस्मानाबाद जिल्ह्यात ढोकी, लोहारा, उमरगा ,अंबी येथे हाणामारी 

 
Osmanabad police

ढोकी : घरासमोरील माकळ्याजागेत दगड टाकण्याच्या कारणावरुन उस्मानाबाद तालूक्यातील कोळेवाडी ग्रामस्थ- सुचिता आकोसकर यांसह त्यांच्या कुटूंबातील आनंद, रघुवीर, राधा, उध्दव यांचा गावकरी- सुनिल आदटराव यांसह त्यांच्या कुटूंबातील सोन्या, सुमित, केशव यांच्यात दि. 20.12.2021 रोजी 17.30 वा.सु. गल्लीत हानामाऱ्या झाल्या. यात दोन्ही कुटूंबीयांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुचिता आकोसकर व सुनिल आदटराव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 452, 504, 506, 34 अंतर्गत परस्परविरोधी 2 गुन्हे नोंदवले आहेत.

लोहारा : समुद्राळ, ता. उमरगा येथील अविनाश कोकाटे, अभिमन्यु कोकाटे व अनुसया कोकाटे यांनी जुन्या वादावरुन दि. 17.12.2021 रोजी 18.30 वा.सु. राहत्या गल्लीत नातलग- सुवर्णा हिराजी कोकाटे व त्यांची मुलगी सायली यांना शिवीगाळ केली. तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने सुवर्णा यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारुन त्यांना गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या सुवर्णा कोकाटे यांनी दि. 20 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अंबी  : तांदुळवाडी, ता. परंडा येथील नाना विजय खरसडे हे दि. 19.12.2021 रोजी 22.00 वा. सु. गावातील दुध डेअरीसमोर शेकोटी पेटवून बसले होते. यावेळी गावकरी- अमोल शिवाजी खरसडे, विश्वास बाळासाहेब खरसडे यांनी तेथे जाउन त्या आगीत दड टाकला असता नाना खरसडे यांनी त्यास जाब विचारला. यावर नमूद दोघांनी नाना यांना शिवीगाळ करुन काठीने, दगडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नाना खरसडे यांनी दि. 20 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : नाईचाकुर, ता. उमरगा येथील काशीबाई पवार या दि. 19.12.2021 रोजी 14.00 वा. सु. आपल्या शेतात गुरे चारत असतांना शेजारील शेतकरी- रणधीर पवार हे काशीबाई यांच्या शेतातील पिकातून पाणी नेण्यासाठी नळी अंथरत होते. यावर काशीबाई यांनी त्यांना नळी बांधाच्या कडेने अंथरण्यास सांगीतले असता रणधीर यांसह त्यांची पत्नी- रागीणी, पुतण्या- शुभम यांनी काशीबाई यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. यावेळी काशीबाई यांच्या बचावास सरसावलेली त्यांची मुले- निखील व निलेश यांसही नमूद तीघांनी पट्ट्याने, दगडाने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या काशीबाई पवार यांनी दि. 20 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web