भूम, शिराढोण, उमरगा, उस्मानाबाद येथे हाणामारी 

 
Osmanabad police

भूम  : वडगाव (वारे), ता. भुम येथील अनिल भगवान करवंदे व गणेश करवंदे या दोघा पिता- पुत्रांनी शेतातील मशागतीच्या कारणावरुन दि. 29.10.2021 रोजी 12.00 वा. सु. वडगाव (वारे) शिवारात भाऊबंद- आश्रुबा अनिल करवंदे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान केली. या मारहानीत अश्रुबा यांचा दात पडून ते जखमी झाले. अशा मजकुराच्या आश्रुबा करवंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : पुणे येथील गणपत दासा मुंढे व शंकर मुंढे या दोघा भावांनी पुर्वीच्या वादावरून दि. 22.10.2021 रोजी 12.30 वा. सु. गोविंदपुर येथील छाया मुंढे यांच्या घरातस घुसून त्यांच्याजवळ त्यांच्या पतीची विचारपूस करुन छाया यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन त्यांच्या डोक्यास बंदुक लावली. अशा मजकुराच्या छाया मुंढे यांनी दि. 29.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 144, 147, 148, 149, 452, 323, 506 सह शस्त्र कायदा कलम- 3, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : औराद, ता. उमरगा येथील शाहुराज दुधभाते, विजय दुधभाते, धिरज दुधभाते या तीघांनी त्यांच्या बांधकामाचे काम पुर्ण करण्यास बांधकाम मिस्त्री- विनायक धरमे, रा. उमरगा यांना दि. 29.10.2021 रोजी 11.30 वा. सु. औराद येथे सांगीतले. यावर धरमे यांनी बांधकामाचे पैसे मागीतले असता नमूद तीघांनी धरमे यांना शिवीगाळ करुन, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व बांधकाम पुर्ण न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विनायक धरमे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : शिंगोली येथील जहांगीर शेख यांच्या नातेवाईकांकडे गावकरी- पाशाभाई बाबुलाल शेख यांची आर्थिक उधारी असल्याने पाशाभाई हे जहांगीर यांच्याकडे उधारी परतफेडीचा तगादा लावत असत. यावर जहांगीर यांनी दि.29.10.2021 रोजी 16.00 वा. पाशाभाई यांना शिंगोली येथील आपल्या दुकानात बोलणी करण्यास बोलावले. यावेळी चर्चेदरम्यान चिडून जाउन पाशाभाई यांनी जहांगीर यांसह त्यांचा मुलगा- इरफान यास शिवीगाळ करुन जहांगीर यांच्या कंबरेवर तर इरफान यांच्या हातावर चाकूने वार करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या जहांगीर शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web