आरळी , गिरवली येथे हाणामारी 

 
Osmanabad police

नळदुर्ग : आरळी (बु.), ता. तुळजापूर येथील नारायण पौळ व सुधाकर पौळ या दोघांचा ग्रामस्थ- अमोल श्रीशैल तानवडे व सागर तानवडे या दोघांशी शेतजमीन मालकीच्या कारणावरुन दि. 27.10.2021 रोजी 11.00 वा. सु. आरळी (बु.) शिवारात वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन नमूद दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्पर विरोधी गटांतील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कोयता, दगडाने मारहान करुन गंभीर जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नारायण पौळ व अमोल तानवडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

वाशी : गिरवली, ता. भूम येथील मिना व तानाजी गायकवाड या पती- पत्नीस गल्लीतील भिमराव गायकवाड यांसह त्यांची पत्नी- बेगम, मुलगा- अंकुश, सुन- सत्यभामा, नातु- एकनाथ तसेच भाऊबंद- बाबुराव, सुखसाबाई यांनी दि. 27 व 28.10.2021 रोजी राहत्या घरासमोर जुन्या वादातून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या तानाजी गायकवाड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                        

From around the web