अनसुर्डा,सुरतगाव, किणी येथे हाणामारी 

 
Osmanabad police

बेंबळी  : अनसुर्डा, ता. उस्मानाबाद येथील वाघमारे कुटूंबातील आण्णा, अनिल, सुनिल, अनिता, माधुरी, छाया या सर्वांनी गावठानच्या भुखंडावरील दगड काढण्याच्या कारणावरुन दि. 08.11.2021 रोजी 21.00 वा. सु. गावातील मरीआई चौकात ग्रामस्थ- निशिकांत दत्तु हुंबे यांसह त्यांची पत्नी व भाऊ यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या निशिकांत हुंबे यांनी दि. 09.11.2021 रोजी 324, 323, 504, 506, 143, 147, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी : सुरतगाव, ता. तुळजापूर येथील लखन भोसले, प्रशांत कांबळे, उत्रेश्वर भोसले, आकाश भोसले, अक्षय भोसले या सर्वांनी पुर्वीच्या भांडणावरुन दि. 07.11.2021 रोजी 15.30 वा. सु. गावातील बुध्दविहारसमोर ग्रामस्थ- नवनाथ सुरते यांसह त्यांची मुलगी- मनिषा व भाचा- मनोज यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नवनाथ सुरते यांनी दि. 09.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : किणी, ता. उस्मानाबाद येथील दंडनाईक कुटूंबातील अभिमन्यु, हणमंत, अक्षय, विलास, हरी, विशाल या सर्वांनी शेत रस्त्याने रहदारी केल्याच्या कारणावरुन दि. 25.10.2021 रोजी 18.30 वा. सु. किणी येथे ग्रामस्थ- नरसिंग विलास हाजगुडे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गज, दगड, काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नरसिंग हाजगुडे यांनी दि. 09.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 143, 147, 148, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web