वृद्ध शेतकऱ्याकडून दोन लाख लाच घेताना धाराशिवमधील बोगस पत्रकार एसीबीच्या जाळ्यात 

 
lach d

धाराशिव -  शासनाने पाझर तलाव व साठवण तलावाकरिता संपादीत केलेल्या शेतजमिनीचा मावेजा मिळवून देतो म्हणून एका वृद्ध  शेतकऱ्याकडून दोन लाख  घेताना धाराशिवमधील एका बोगस पत्रकारासह दोघांना एसीबी पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल  केला आहे. 

 बाबासाहेब हरीशचंद्र अंधारे, वय 42 वर्षे, संपादक दैनिक मराठवाडा योध्दा , रा. गणपती मंदिर जवळ, आनंदनगर, उस्मानाबाद व 1) अनिरुद्ध अंबऋषि कावळे (खाजगी इसम) , वय 52 वर्षे, रा. केकस्थळवाडी, उस्मानाबाद अशी या लाचखोरांची नावे आहेत. 

यातील तक्रारदार  वृद्ध शेतकरी (  वय ७७ ) यांचे पत्नीच्या नावे असलेली शेत जमीन शासनाने पाझरतलाव व साठवण तलावा करिता संपादीत केलेली असून सदर संपादित जमिनीचा न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अधिकचा मोबदला प्रांत कार्यालय, उस्मानाबाद येथील अधिकारी व कर्मचारी यांना सांगुन तुमचे संपादित जमीनीचा मोबदला 26,56,017/- रुपये व 4,31,798/- रुपयेचा असे दोन्ही चेक काढुन देण्याकरिता 2,00,000/- रुपये लाच रकमेची  मागणी करून सदर लाच रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरबाबत पोलीस ठाणे आनंदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

हा सापळा अधिकारी - विकास राठोड, पोलीस निरीक्षक  व  पोलीस अंमलदार इफतीकार शेख, दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, आशिष पाटील, विष्णू बेळे, विशाल डोके,सिद्धेशर तावस्कर, अविनाश आचार्य, नागेश शेरकर, जाकेर काझी, चालक करडे यांनी रचला होता. 

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा
कार्यालय 02472 222879 टोल फ्री क्रमांक.1064

From around the web