उमरगा नायब तहसिलदारांच्या नावे बनावट प्रमाणपत्र 

दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल 
 
 
crime

उमरगा  : आरोपी नामे-1) शिशीर रतीलाल गांधी, (सध्या मयत) रा. 158/ बी आशीर्वाद बंगलो, रेल्वेलाईन, दर्बी कलेक्शनजवळ सोलापूर जि. सोलापूर यांनी दि.24.06.2023 रोजी 10.00 वा. सु. तहसिल कार्यालय उमरगा येथे अज्ञात व्यक्ती कडून साक्षीदार नामे डॉ रोहन काळे नायब तहसिलदार यांचे नावाने बनावट नाहरकत प्रमाणपत्र तयार करुन तसेच तहसिल कार्यालय उमरगाचा बनावट शिक्का वापरुन साक्षीदार श्री. काळे यांची बनावट सही करुन सदर बनावट प्रमाणपत्र आधारे जमिणीचे कुळाबाबत प्रकरण न्याप्रविष्ठ असताना देखील विवादीत जमीन रजिस्ट्री करुन इसम नामे संगप्पा सिद्रमप्पा धुमुरे व झाकीर हुसेन आयुब बागवान या दोघांना विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. 

भुयार चिंचोली येथील सर्वे नं 155 गट नं 372 मध्ये एकुण 10 हेक्टर 84 आर जमिणीचे कागदोपत्री फसवणूक करुन विक्री केली. अशा मजकुराच्या रतन विश्वनाथ काजळे, वय 54 वर्षे, धंदा नोकरी नायब तहसीलदार उमरगा, रा. कदेर ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दि.02.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 471, 420, 465, 468 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : आरोपी नामे- राजेश अरुण म्हेत्रे, वय 31 वर्षे, रा. रामनगर उस्मानाबाद, यांनी दि. 01.01.2022 रोजी ते दि.21.07.2022  पावेतो ॲक्सीस बॅकेचे मायक्रोफायनान्स विभागात कर्जदार यांना कर्ज् वाटप केलेले 41 कर्जदात्यांकडून त्यांचे राहते घरी जावून त्यांनी 96,642 ₹ बॅकेचे कर्ज खात्यावर भरण्यासाठी दिलेले पैसे त्यांचे कर्ज खात्यावर न भरता नमुद रक्कमेचा अपहार करुन कर्जदारांची व बॅकेची फसवणूक केली. अशा मजकुराच्या श्रीधर मधुकर भोर, वय 42 वर्षे  डेप्युटी जनरल मॅनेजर मे. क्वेस कॉर्प रा. दिशा को. हाउसिंग सोसायटी रुम नं 203 डोंबीवली पुर्व ता. कल्याण जि. ठाणे यांनी दि.02.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 406, 408 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web