मुलीच्या नावे फेसबूकवर बनावट खाते 

बदनामीकारक मजकूर प्रसिध्द तरुणावर गुन्हा दाखल
 
Osmanabad police

उस्मानाबाद  : सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाने उसमानाबाद तालूक्यातील एका मुलीच्या नावे फेसबूकवर दि. 21.11.2021 ते 19.12.2021 दरम्यान बनावट खाते उघडले. या खात्यातून त्याने त्या मुलीच्या नात्यातील एका तरुणास धमकावून शिवीगाळ करणारे, त्या मुलीसोबत आपले पे्रमसंबंध आहेत अशा मजकुराचे संदेश पाठवून मुलीची बदनामी केली. अशा मजकुराच्या मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 500, 504, 507 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
लैंगिक अत्याचार

उस्मानाबाद  : जिल्ह्यातील एका खेडेगावातील 21 वर्षीय मतीमंद, मुकबधीर तरुणीस तीच्या कुटूंबीयांनी शेतातील पत्रा शेडमध्ये कुलूप बंद करुन ठेवले होते. ही संधी साधून दि. 18-19.12.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडून शेडमधील त्या तरुणीस मारहान करुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या मुलीच्या कुटूंबीयांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 452, 324 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web