विद्यार्थाचा परिपोषण अनुदानाचा चेक संस्थेच्या नावाने उचलून १० लाखाचा अपहार 

बलसूरच्या संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल 

 
 
crime

उमरगा  : बलसुर, ता. उमरगा येथील- मुकिंद चव्हाण, रमेश गुंड, रोहीत  चव्हाण, मिनाक्षी चव्हाण यांनी दि. 21.10.2022 रोजी नंदुराम प्राथमिक आश्रमशाळा, भाउसाहेब नगर बलसुर तांडा बलसुर शाळेचे 5,00,000 ₹  व सखुबाई माध्यमिक निवासी आश्रमशाळा, भाउसाहेब नगर बलसुरतांडा बलसुर शाळेचे 5,00,000₹ असे एकुण 10,00,000 ₹ चा समाज कल्याण कार्यालया मार्फत येणारा विद्यार्थाचा परिपोषण अनुदानाचा चेक संस्थेच्या नावाने उचलून घेवून शासकीय रक्कमेचा अपहार केला. अशा मजकुराच्या गुलाबदास चव्हाण यांनी दि. 08.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406, 420, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरीचे तीन गुन्हे दाखल 

धाराशिव  : समतानगर, उस्मानाबाद येथील- अनिल रामचंद्र पाटील वय 63 वर्षे, यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची स्पेलंन्डर मोटरसायकल क्र एम एच 25 एए 3205 ही दि. 06.06.2023 रोजी 23.30 ते 07.06.2023 रोजी 05.00 वा. सु. पाटील यांचे घराचे समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या अनिल पाटील यांनी दि. 08.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : घाटनांदुरी, ता. भुम येथील- समाधान दशरथ भालेराव वय 42 वर्षे, यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची टी. व्ही. एस. मोटरसायकल क्र एम एच 25 एएस 0923 ही दि. 01.05.2023 रोजी रात्री 20.00 ते 10.30 वा. सु. यशमंगलकार्यालय भुम येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या समाधान भालेराव यांनी दि. 08.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : जळकोट, ता. तुळजापूर येथील- शिवराज शिद्राम यादगौडा यांचे जळकोट शिवारातील शेत गट नं 70 मधील अंदाजे 6,300₹ किंमतीचा विद्युत पंप हा दि.04.06.2023 रोजी 18.00 ते दि.05.06.2023 रोजी 07.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या समाधान भालेराव यांनी दि. 08.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web