आलूरमध्ये शेतीच्या वाटणीवरुन वृद्धाची आत्महत्या
मुरुम : उमरगा तालुक्यातील आलूरमध्ये शेतीच्या वाटणीवरुन एका वृद्धाने विहरीत उडी घेउन आत्महत्या केली , याप्रकरणी मुरूम पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत नामे-सिद्राम धुळाप्पा माळी, वय 77 वर्षे, रा. आलुर, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी शेतीच्या वाटणीचे कारणावरुन दि.03.08.2023 रोजी 19.00 ते दि.04.08.2023 रोजी 08.30 वा. सु आलूर शिवारात सुभाष चिट्टे यांचे विहरीत उडी घेउन आत्महत्या केली. आरोपी नामे 1) काशीनाथ धुळाप्पा माळी, 2) मलाम्मा काशीनाथ माळी, 3) मल्लीनाथ काशीनाथ माळी, सर्व रा. आलुर, मा. उमरगा, 4) संगिता गुरुनाथ माळी रा. पेठसांगवी ता. उमरगा, 5) श्रीशैल शरणाप्पा माळी रा. केसरजवळगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करुनधमकी देवून मानसिक त्रासास कंटाळून सिद्राम माळी यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- राजेंद्र सिद्राम माळी रा. आलुर ता. उमरगा जि. उस्मानाबाद हा.मु. गुरुकृपा बिल्डी्रग बालाजी नगर राम मंदीर जवळ गुलबर्गा ता. जि. गुलबर्गा यांनी दि. 04.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.दं. वि. सं कलम- 306, 34अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कॅरम खेळण्यासाठी नकार दिल्याचे कारणावरुन मारहाण
बेंबळी : आरोपी नामे-1)श्रीनाथ कुमार कुकडे, रा.समुद्रवाणी ता. जि. उस्मानाबाद यांनी कॅरम खेळण्यासाठी नकार दिल्याचे कारणावरुन दि.03.08.2023 रोजी 21.00 वा. सु. गावातील अविनाश वाघमारे यांच्या पानपट्टी जवळ समुद्रवाणी येथे फिर्यादी नामे-चॉदपाशा अल्हाउद्दीन तांबोळी, वय 48 वर्षे, रा.समुद्रवाणी ता. जि. उस्मानाबाद यांना श्रीनाथ कुकडे हे कॅरम खेळण्यासाठी बस म्हणाले असता त्यावर चॉदपाशा तांबोळी यांनी नको म्हणल्याचा राग मनात धारुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी, लोखंडी कड्याने डोक्यात मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या चॉदपाशा तांबोळी यांनी दि.04.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वारदवाडी येथे हाणामारी
परंडा : आरोपी नामे-1)विजय गरड, 2) गणेश शिनगारे दोघे रा. कात्राबाद ता. परंडा जि. उस्मानाबाद यांनी दि.03.08.2023 रोजी 16.30 वा. सु वारदवाडी परंडा रोडवर विटभ्ट्टीजवळ फिर्यादी नामे करण बाबुराव भोसले, वय 19 वर्षे, रा. कात्राबाद ता. परंडा जि. उस्मानाबाद हे व त्यांचा मित्र थांबले असता विजय गरड यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी दगडाने मानेवर मारहान करुन जखमी केले. तसेच गणेश यांनी लाकडी काठीने तु लय माजलास असे म्हणून हातावर खांद्यावर मारहान केली. हातपाय तोडून जिवेच मरुन टाकतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या करण भोसले यांनी दि.04.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506,34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.