उस्मानाबादेत डॉक्टरची नर्सला मारहाण
उस्मानाबाद - शहरातील गणेशनगरमधील एका खासगी हॉपिस्टलमध्ये डॉक्टरने नर्सला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी नर्सने शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी मारहाण करणाऱ्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील गणेशनगरमध्ये पल्लवी हॉस्पिटल आहे. या हॉस्पटिलमध्ये खाजानगर भागातील एक २९ वर्षीय महिला नर्स म्हणून काम करते. ८ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास रात्रपाळीच्या वेळी ही नर्स कामावर असताना, एका रुग्णाला सलाईन चालू होते.इतक्यात या हॉस्पिटलचे डॉक्टर मुकुंद कुलकर्णी आले आणि रुग्णाचे सलाईन अजून का संपले नाही म्हणून या नर्सला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.
या शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी सदर नर्सने शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असता, पोलिसांनी डॉ. मुकुंद कुलकर्णी विरुद्ध भादंवि ३२३ आणि ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना शेंडगे करीत आहेत.