ढोकी : मोबाईलवर कॉल करून दोन लाखाची फसवणूक 

 
crime

ढोकी  : ईर्ला, ता. उस्मानाबाद येथील- बाबासाहेब गोपीनाथ चौरे यांच्या भ्रमणध्वनीवर दि. 23.01.2023 रोजी 11.00 वा. सु. एका भ्रमणध्वनीवरुन कॉल आला. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने क्रेडीट कार्डचा नंबर बाबासाहेब यांचे कडून घेउन त्यांच्या क्रेडीट कार्डवरुन अनुक्रमे 1,93,800 ₹ रक्कम 19 ट्रांजेक्शनद्वारे काढण्यात आली. अशा प्रकारे त्यांची फसवणूक झाल्याने त्यांनी दि.04.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66(सी) (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम : नागेवाडी, ता. भुम येथील- धोडींराम ऊर्फ बाबुराव रामकिसन मांगले यांच्या मालकिची जमिन दि. 14.11.2022 रोजी 15.30 वा. सु. सब रजिस्टर ऑफीस भुम येथे शेत गट नं 46/ई मध्ये साक्षीदार यांचे नावे बनावट भडेपट्टा दस्त तयार करुन नागेवाडी, ता. भुम येथील- अशोक ढोले, भरत ढोले, रावसाहेब ढोले,श्रीराम ढोले,प्रतिभा ढोले यांनी संगणमताने तो बरोबर व खरा आहे असे भासवून मेसर्स न्यिु सुर्या रोशणी प्रा.लि. या कंपनीचे प्राधिकृत अधिकारी यांना भाडेपट्टे अधारे जमिन देवून धोडींराम यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या धोडींराम मांगले यांनी दि.04.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 468, 470, 471, 406, 420, 409, 34 कायदा कलम अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web