ऑनलाईन जॉब शोधणाऱ्या धाराशिवमधील तरुणास ९० हजाराचा फटका 

 
crime

धाराशिव :  ऑनलाईन जॉब शोधणाऱ्या धाराशिवमधील एका तरुणास ९० हजाराचा फटका बसला आहे. या फसवणूक प्रकरणी सदर तरुणाने सायबर पोलिसात धाव घेतली आहे. 

गालीबनगर, उस्मानाबाद येथील- यासरे अराफत ग्यासोद्दीन शेख, वय 28 वर्षे, हे इंन्स्टाग्राम वर ऑनलाईन जॉब करीता असलेल्या स्टोरीला क्लीक केले असता त्यांच्या भ्रमणध्वनीवर दि. 09.08.2023 रोजी 14.06 वा. सु. एका भ्रमणध्वनी क्रमांक 7268999122 वरुन हॉटसॲपवर सदर पेज रिडायरेक्ट झाले त्यानंतर सदर आरोपीने  फिर्यादीस देलीग्रामवरुन टास्कची माहिती देवून त्याला पैसे गुंतवण्यास सांगितले असता फिर्यादीने पैसे गुंतवल्यावर ज्या वेळेस तृयाने ते विड्रॉल करण्याचा प्रयतृन केला त्यावेळेस ते विड्रॉल झाले नाहीत. त्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांचे बँक खात्यातील एकुण 89,900 ₹ रक्कम काढून ऑनलाईन फसवणुक झाली. अशा मजकुराच्या यासेर अराफत ग्यासोद्दीन शेख यांनी दि. 15.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो ठाणे भा.दं. वि.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

                                         

From around the web