धाराशिव : एकाची जमीन दुसऱ्याने विकली  : गुन्हा दाखल  

 
crime

धाराशिव  : आरोपी नामे-1) मोहमद इकबाल गुलाम दस्तगीर, रा. शिंगोली ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.29.04.1998 रोजी 10.00 ते 17.00 वा. सु. सहा दुय्यम निबंधक कार्यालयात उस्मानाबाद येथे फिर्यादी नामे- मोहमद शकील गुलाम दस्तगीर अन्सारी, वय 60 वर्षे रा. शिंगोली हा. मु. अ.803 रुनवाल अलिन मेहरा कंपाउंट साकीनाका मुंबई यांचे मालकीची व कब्जेवहीवाटीची कुमाळवाडी येथील गट नं 87 मधील क्षेत्र 02 हे 22 आर चे खोटे आणि बनावट खरेदी खत उस्मानाबाद रजिस्टर ऑफीस येथे बनवुन फिर्यादीची नमुद आरोपीने खोटा व बनावट ईसम उभा करुन फिर्यादी असल्याचे भासवून फियादीच्या मालकीची शेत जमीनीचा खोटा व बनावट खरेदी खताचा दस्त तयार करुन फसवणूक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी मोहमद शकील मुलाम दस्तगीर अन्सारी यांनी दि.22.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-420,465, 471 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 धाराशिव  :फिर्यादी नामे- रुपाली रवि पाटील, वय 29 वर्षे रा. नुतन शाळेच्या पाठीमागे तांबरी विभाग उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद या दि. 18.07.2023 रोजी 11.00 वा. सु. लातुर ते उस्मानाबाद येथुन बसने प्रवास करुन उस्मानाबाद बसस्थानकावर उतरल्या असता रुपाली पाटील यांचे गळ्यातील सोन्याचे मिनी गंठन 13 ग्रॅम वजनाचे अंदाजे 68,000₹ किंमतीचे गर्दीचा फायदा घेवून अज्ञात व्याक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या रुपाली पाटील यांनी दि.22.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग  : फिर्यादी नामे- शिवराज प्रभाकर कुताडे, वय 39 वर्षे रा. अणदुर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 50,000₹ किंमतीची हिरो कपंनीची एच एफ डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 25 एजी 3745 ही दि. 21.08.2023 रोजी 09.30 ते 05.00 वा. सु.  लक्ष्मी कॉम्पलेक्स चिवरी पाटी अणदुर  येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शिवराज कुताडे यांनी दि.22.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web