धाराशिव : ॲट्रासिटी कायद्याखाली तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 
crime

धाराशिव  : आरोपी नामे-1) इमरान कुरेशी रा. खॉजा नगर उस्मानाबाद, 2) शाहरुख निसार पिराजी,रा. माळी गल्ली नागनाथ रोड, उस्मानाबाद 3 ) सागर उर्फ चित्या कबीर गायकवाड रा. आझाद चौक कुरेशी गल्ली उस्मानाबाद यांनी दि.21.08.2023 रोजी 20.40 वा. सु. पारधी पिढी उस्मानाबाद येथे फिर्यादी नामे- संतोष दगडू पवार, वय 24 वर्षे, रा. साठे चौक पारधी पिढी, ता. जि. उस्मानाबाद यांचे घरासमोर देवकार्याचा कार्यक्रम चालू असताना नमुद आरोपी हे दारु पिवून आल्याने फिर्यादी त्यास म्हाणाले की तुम्ही कार्यक्रमात दारु पिवून कशाला आलात? तुमचा काय संबंध आहे? इथे यायचे नाही, असे म्हणाल्यावरुन नमुद आरोपीतांनी फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी संतोष पवार यांनी दि.22.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 34 सह अ.जा.ज.अ.प्र. कलम 3(1) (आर) (एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

हाणामारीचे दोन गुन्हे 

कळंब  :आरोपी नामे- 1)रघुनाथ मोरे, अंदोरा ता. कळंब जि.उस्मानाबाद यांनी जनावरे निट बांधण्याचे कारणावरुन दि.21.08.2023 रोजी 08.00 वा. सु. अंदोरा शिवार फिर्यादी नामे सुदंरम मोतीराम नवघरे, वय 32 वर्षे रा.अंदोरा, ता. कळंब जि.उस्मानाबाद यांनी आरोपीस म्हणाले की तुमचे जनावरे हे व्यवस्थित बांधत जावा ते सुटुन माझे शेतात आल्याने ते विचारले असता वर नमुद आरोपीने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने डोकृयात मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी सुदंरम नवघरे यांनी दि.22.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 506, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : आरोपी नामे-1)कमलाकर कल्याणराव माने रा. शिंगोली ता. कळंब जि. उस्मानाबाद हे कार मधून गावात येत असताना दि. 13.08.2023 रोजी 18.30 वा. सु. माळी वस्ती भगवान विष्णू माळी यांचे घराजवळ शिंगोली शिवार येथे गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरुन रमाकांत शिवाजी मते, शशिकांत शिवाजी मते, रामेश्वर मते यांना शिवीगाळ केली. व फियादीचा नातेवाईक रमाकांत मते यांना तु माझे सासऱ्याची जमीन का विकत घेतली असे म्हणून कुह्राडीच्या दांड्यानी कपाळावर मारहाण केली. तसेच फिर्यादी नामे- अनिल नागुराव माने, वय 42, रा. शिंगोली ता. कळंब जि. उस्मानाबाद हे त्यांचे नातेवाईक रमाकांत मते यांचे बचावास गेले असता नमुद आरोपीने फिर्यादीस कुह्राडीचे दांड्याने उजव्या पायाच्या नडगीवर मारुन पाय फॅक्चर करुन गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अनिल माने यांनी दि.22.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 324, 504,506, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
 

From around the web