धाराशिव :  प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
s

 धाराशिव   : रुईभर ता. जि. उस्मानाबाद येथील- यासीर बशीर सय्यद यांनी दि.24.08.2023 रोजी 11.30 वा.सु. शिंदे महाविद्यालय समोर आयशर टॅम्पो क्र एमएच 46ई 0660 मध्ये क्षेमतेपेक्षा जास्त गोवंशीय जनावरे टेम्पो मध्ये दाटीवाटीने भरुन वाहतुक करत असताना फिर्यादी नामे अशितोष रविंद्र कदम, वय 23 वर्षे, रा. तेर ता. जि. उस्मानाबाद यांनी त्यास वाटेत थांबवून गायीबाबत चौकशी करीत असताना आरोपीने नीट माहिती दिली. त्यावर पोलीसात माहिती का दिली असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ केली.  अशा मजकुराच्या फिर्यादी  अशितोष कदम यांनी दि.24.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे प्राण्यांना निर्दयपणे वागणूक कायदा कलम 11 (1)(डी) (ई) सह भा.द.वि.सं. 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 

 पोलिसाबरोबर हुज्जत 

 पोलीस ठाणे ग्रामीण येथील पोलीस अंमलदार- राजेंद्र रामा राठोड, 46 वर्षे, हे दि.24.08.2023 रोजी 13.15 वा. सु. डायल 112 ड्युटी कामी असताना त्यांना कॉल आल्याने ते कॉलरच्या घटनास्थळी शिंदे महाविद्यालया समोर वरुडा ते उस्मानाबाद रोडवर गेले असता जनावरांचा आयशर टॅम्पो क्र एमएच 46 ई 0660 हा कॉलरने आडविल्यामुळे अनोळखी 10 ते 12 ईसम यांनीएकत्र येवून संगणमत करुन गैरकायद्याची मंडळी जमवून पोलीसांशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून दगडफेक करुन शासकिय कर्तव्य पार पाडण्यास अडथळा निर्माण केला. तसेच तेर कडून येणाऱ्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. यावरुन राजेंद्र राठोड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 336, 143, 147, 149, 427  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परस्पर विरोधी तक्रार दाखल   

आरोपी नामे- 1)अशितोष रविंद्र कदम, वय 23, रा. तेर जि. उस्मानाबाद यांनी गायी वाहतुक करण्याचे कारणावरुन दि.24.08.2023 रोजी 04.15 वा. सु. तेर ते उस्मानाबाद रोडवर शिंदे महाविद्यालय समोर फिर्यादी नामे- यासीर बशीर सय्यद, वय 30 वर्षे, रा. रुईभर ता. जि. उस्मानाबाद यांचा आयशार टॅम्पो क्र एमएच 46 ई 0660 मध्ये गाई भरुन घेवूनजात असताना यातील आरोपीने वाटेत आडवून तु या गाई कोठे नेत आहेस असे म्हणाला असता फिर्यादी म्हाणाला की माझा जनावराचा व्यापार असुन विक्री साठी नेत आहे. तु गायी कापण्यासाठी नेत आहेस असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या यासीर सय्यद यांनी दि.24.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 341, 504, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
अवैध जनावराचे मांस वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात गोवंशीय जणावराची होणारी अवैध वाहतुक व कत्तल यावर कार्यवाही करणे बाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने परंडा पोलीस ठाण्याचे पथक दि. 24.08.2023 रोजी 12.15 वा.सु. पो.ठा. हद्दीत दर्गा रोड कुह्राड गल्ली जाणारे रोडवर परंडा ता. परंडा जि. उस्मानाबाद येथे पेट्रोलिंग करत होते. दरम्यान दर्गा रोडवरुन एक पिकअप क्र. एम.एच. 42 बी 4203 येत असताना पथकास दिसल्याने पथकाने त्यास थांबण्यास सागिंतले. पथकाने संशयावरून चालकास विचारपुस केली असता त्याने आपले नाव- तौकीर शकील कुरेशी, वय 23 वर्षे रा. कसाब गल्ली, परंडा, ता. परंडा जि. उस्मानाबाद असे सागिंतले. पिकअप मधून दुर्गंधयुक्त पाणी गळत असल्याने पथकाने संशयावरून पिकअपचे पाठीमागे हौद्यात डोकावून पाहिले असता आत जनावराचे मांस दिसून आले. यावर पोलीसांनी नमूद पिकअप चालकास त्या मांस वाहतुक परवाण्याबाबत विचारले असता परवाना नसल्याचे त्यांनी सांगीतले. यावर पथकाने अंदाजे 6,27,300 ₹ किंमतीच्या नमूद पिकअपसह त्यातील अंदाजे 3,27,300 ₹ किंमतीचे सुमारे 2,185 किलो जनावरांचे मांस  असा एकुण 6,27,300 ₹ जनावराचे मांस जप्त केले. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक- फिरोज शेख यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5(क), 9, 9 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी- इज्जपवार, सपोनि श्री. मुसळे, पोलीस नाईक- शेख, पोलीस ठाणे परंडाचे पथकांनी केली आहे.                   

From around the web