धाराशिव :  चोरीच्या तीन मोटारसायकलसह आरोपी जेरबंद 

 
s

धाराशिव -  धाराशिव आणि तुळजापूर तालुक्यात मागील काही दिसवापासून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. या प्रकरणी एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून चोरीच्या तीन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. 


अपसिंगा, ता. तुळजापूर येथील- अतुल सोमनाथ गोरे यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची एच एफ डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 25 ए ए 6143 ही दि.30.05.2023 रोजी 07.00 ते 08.00 वा. दरम्यान छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडत लाईन उस्मानाबाद येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. अशा मजकुराच्या अतुल गोरे यांनी दि. 01.06.2023 रोजी दिलेल्या. प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद पोलीस ठाणे येथे भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवला आहे. तसेच सिध्दार्थनगर, साजा येथील- रोहन किशोर माने यांची 15,000₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एक्स 9125 ही दि.10.01.2023 रोजी 21.00 तेरणा इंजिनीअरींग कॉलेज समोर उस्मानाबाद येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. अशा मजकुराच्या रोहन माने यांनी दि. 02.06.2023 रोजी दिलेल्या. प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्र. 191/2023 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवला आहे. गुन्हा क्र. 188/2023, गुरनं 92/2022 भा.द.स. कलम 379 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास दि.02.06.2023 रोजी गोपनिय माहिती मिळाली की, तुळजापूर नाका, उस्मानाबाद येथील ईसम नामे- अहमद अली शेख रा. तुळजापूर नाका, उस्मानाबाद  याच्याकडे चोरीच्या मोटरसायकली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर ठिकाणी जावून नमुद इसमास तुळजापूर नाका येथुन ताब्यात घेऊन त्याच्याकडे कैशल्य पुर्ण तपास करुन त्याचेकडून वर नमूद गुन्ह्यातील 3 मोटरसायकल जप्त केल्या. सदर आरोपीस चोरीच्या नमूद मोटारसाकलसह पुढील कारवाईस्तव उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

            सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, अशोक ढगारे, रविंद्र आरसेवाड, बलदेव ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.

चोरीचे दोन गुन्हे दाखल 

लोहारा  : वडगाव वाडी, ता. लोहारा येथील- महादेव खंडाप्पा बेळे यांची अंदाजे 35,000 ₹ किंमतीची युनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच 25 ए आर 9780 ही दि.28.05.2023 रोजी 23.30  ते दि. 29.05.2023 रोजी 06.00 वा. दरम्यान बेळे यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या महादेव बेळे यांनी दि. 02.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : लक्ष्मी नारायण अपारमेंट प्लॉट नं 201,अमरावती येथील- राजगोपाल हरिहर गुल्हाने, वय 43 वर्षे हे सोबत कुटुंबासह ट्रायव्हल्स क्र एम एच  14 डी जी 7662 सह अक्कलकोट येथे जात होते. दि.02.06.2023 रोजी 05.00 ते 06.00 वा. सु पारगाव टोलनाका ते उपळाई पाटी दरम्यान अज्ञात 4 व्यक्तीने ट्रायव्हल्सच्या वर दोरीने बांधलेल्या 10 बॅगपैकी दोन कपडयाचृया बॅग व लाल रंगाचे सुटकेस मध्ये ठेवलेले   15 तोळ्याचे सुवर्ण दागिणे, 358 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे व रोख रक्कम 3,000₹ असा एकुण 6,26,400₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या राजगोपाल गुल्हाने यांनी दि. 02.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web