धाराशिव : मोबाईल चोरणारी महिला चोर गजाआड 

 
crime

धाराशिव  : फडका, ता. भुसावळ येथील- मनिषा किशोर पाटील ह्या दि 25.03.2023 रोजी  08.20 ते 08.30 वा. सु. त्यांचे गावी भुसावळ येथे जाण्यासाठी तुळजापूर बसस्थानक येथुन मलकापूर बसमध्ये चढत असताना अज्ञात स्त्रीने गर्दीचा फायदा घेत मनिषा यांचे नकळत त्यांच्या हातातील पर्स मधील रोख रक्कम 6,000 ₹, मोबाईल फोन व पॅन कार्ड, आधार कार्ड, असा एकुण 11,000 ₹ किंमतीचा माल जबरीने लुटून पसार झाली होती. अशा मजकुराच्या मनिषा पाटील यांनी दि.25.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा क्र. 112/2023 हा नोंदवला आहे. 

सदर गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन तुळजापूर बसस्थानक येथुन चोरीस गेलेला मोबाईल फोन व रोखरक्कम ही महिला नामे मिनाक्षी उमेश भोसले रा. साठेनगर उस्मानाबाद हिने चोरुन नेले असुन ती सध्या तिच्या राहत्या घरी आहे. अशी खात्रीलायक बातमी  मिळालेवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बातमीच्या  ठिकाणी  जावून महिला नामे मिनाक्षी उमेश भोसले, वय 32 वर्षे रा. साठेनगर हीस राहत्या घरातून नमूद लुटीतील मालापैकी मोबाईल फोन, रोख रक्कम व इतर कागद पत्र असा एकुण- 9,000 ₹ किंमतीच्या मालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाईस्तव तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

From around the web