उमरग्यात डान्सबारवर छापा, ९ बारबालासह ३५ आंबटशौकीन ताब्यात

उमरगा - उमरगा चौरस्ता नजीकच्या लातूर रोडवरील सौदागर ऑर्केस्ट्रा बार व रेस्टॉरंट येथे अवैधरित्या नियमांचे उल्लंघन करून महिला नृत्यांगनावर पैसे उधळून अश्लील व बीभत्स हावभाव करून नृत्य सुरू असताना धडाकेबाज सहाय्यक पोलिस अधीक्षक ( उप विभाग कळंब) एम रमेश यानी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकून ९ बारबालासह ३५ आंबटशौकीन ताब्यात घेतले तसेच 58,51 ,680 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला . ही कारवाई शुक्रवारी पहाटे २ ते ४ च्या दरम्यान करण्यात आली .
उमरगा चौरस्ता येथील लातूर रोडवर सौदागर और्केस्ट्रा बार व रेस्टॉरंट आहे . या ठिकाणी बार मॅनेजर व कामगारांनी शासनाने नेमून दिलेल्या नियमावलींचे व परवानाचे उल्लंघन करून ,रात्री उशीरापर्यंत बार चालू ठेवले होते. या बार मध्ये मोठ्या आवाजात म्युझिक सिस्टीमवर गाणे सुरू होते . यावेळी ९ नृत्यांगना बारमधील उपस्थित आरोपी समोर अश्लील हावभाव करून नृत्य करीत होत्या . तर हॉटेलच्या नावाने टेन लव्हर्स नावाचे कागदी कुपन नृत्य करणाऱ्या महिलावर उधळण करीत होते .
एका गुप्त माहिती वरून उस्मानाबादचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यानी आपल्या सहकार्यासह शुक्रवारी पहाटे छापा मारला . यात ३५ इसमविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि कलम अनव्ये ,महिलांच्या अश्लील नृत्यास प्रतिबंध घालणे,व महिलांच्या प्रतिष्ठाचे संरक्षण करणे बाबतच्या अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुंह्यातिल आरोपीकडून रोख रक्कम एक लाख पाच हजार ,सात कार ,चार मोटारसायकल,२९ मोबाईल व सौदागर टेन लव्हर्स नावाचे कागदी कुपन असे एकूण ५८,५१,६८० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
सदर ची कामगिरी एम रमेश सहाय्यक पोलिस अधीक्षक उप विभाग कळंब यांच्या नेतृत्वाखाली कळंब पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरिक्षक पुजरवाड ,पोलिस कॉंस्टेबल फतेपुरे ,तारळकर ,गायकवाड, शिंदे , पोलिस नाईक शेख, भांगे,पठाण,खांडेकर,गरड ,राऊत,चव्हाण,सर्व कळंब पोलीस ठाणे तसेच उमरगा पोलीस ठाण्यातील पोलीसनिरीक्षक मनोजकुमार राठोड,सपोनि महेश क्षीरसागर, पोलिस कर्मचारी मुंडे,सुनीता राठोड यानी या कारवाईत भाग घेतला .
कळंब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी एम रमेश यानी कळंब पोलीस ठाण्यातील कर्मचारी घेउन १५० किलोमीटर अंतरावर येउन छापा टाकतात . तर येथील उमरगा पोलीस अधिकारी अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बार कडे कसे काय दुर्लक्ष करतात असा सवाल विचारला जात आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्या कार्यकालात कायदा व सुव्यवस्थाचे बारा वाजले आहेत . गुन्हेगारांना उमरगा पोलिसांची बिल्कुल भीती राहिलेली नाही . चोऱ्या, घरफोडी ,जेष्ठ व्यक्तीचे सोने लुटून नेणे,मोटारसायकल चोरी सर्रासपणे घडत असताना, पोलिस निरीक्षक राठोड यांचे सुव्यवस्था राखण्यासाठी बिल्कुल नियंत्रण नाही . जिल्हापोलिस प्रमुख सुद्धा कमी लक्ष देत असल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे . गुन्हेगारांनी ' लक्ष्मण ' रेषा ओलांडली असून ,अनेक तक्रारी तर उमरगा पोलीस ठाण्यात घेतल्या जात नाहीत. गेल्या एका महिन्यात अनेक तक्रारी तर आमदार कडे करण्यात आल्या . मग उमरगा पोलिस काय करतात असा प्रश्न निर्माण होतो .