गौण खनिज (वाळू) अवैधरित्या चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
कळंब - कळंब पो.ठा. चे पथक कळंब शहरात दि. 06.01.2021 रोजी 20.30 वा. सु. दर्गा रोड, कळंब येथे गस्तीस होते. यावेळी लाखा, ता. केज, जि. बीड येथील अनिल चव्हाण व सागर घाडगे हे एका ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रेलर मधून मांजरा नदीतील 0.5 ब्रास वाळू चोरुन नदी पात्राबाहेर वाहून नेत असल्याचे आढळले. यावरुन यावरुन वाळुसह वाहतूकीचे ट्रॅक्टर- ट्रेलर जप्त करुन नमूद दोघांविरुध्द कळंब पो.ठा. च्या पोकॉ- अमोल जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
चोरी
उमरगा : उमरगा येथील बिरुदेव मंदीरातील दोन लोखंडी दानपेट्या दि. 05- 06.01.2021 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने मंदीराबाहेर नेउन त्या दानपेट्यांचे कुलूप तोडले आणि आतील अंदाजे 60,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या बालाजी घोडके, रा. उमरगा यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील डॉ. आंबेडकर चौकातील पुलाखाली जमिनीत पुरलेले दुरसंचार कार्यालय उस्मानाबाद यांच्या दुरध्वनी यंत्रनेचे 800 पी.आर. प्रकारचे 45 फुट तांबे धातूचे वायर दि. 04.01.2021 रोजी 06.00 वा. पुर्वी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या कनिष्ठ दुरसंचार अधिकारी- सुहास यत्नाळकर यांनी दि. 06 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.