उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी, विनयभंग, फसवणूक, मारहाण आदी गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

चोरी

वाशी  : चंद्रकांत हनुमं उंदरे, रा. आदर्शनगर, वाशी यांनी त्यांचे पिकअप वाहन क्र. एम.एच. 25 पी 2718 हे वाशी शिवारातील आपल्या शेतात ठेवलेले असतांना दि. 11- 12 सप्टेंबर दरम्यान अज्ञाने चोरुन नेले. अशा मजकुराच्या उंदरे यांनी दि. 13 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी  : रुईभर येथील नानासाहेब पवार यांनी त्यांच्या व्हिक्टर मोटारसायकल व वेगो स्कुटर या दि. 11 सप्टेंबर रोजी 23.30 वा. आपल्या घरासमोर लावल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही वाहने लावलेल्या जागी न आढळल्याने त्यांनी गावात शोध घेतला असता ती दोन्ही वाहने गावकरी- भागवत पाडोळे यांच्या घरासमोर आढळली. यावरुन भागवत व त्यांची दोन मुले- राम, शाम  या तीघांनी ती वाहने चोरली आहेत. अशा मजकुराच्या पवार यांनी दि. 13 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

विनयभंग

उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका खेडेगावातील 30 वर्षीय महिला दि. 9 सप्टेंबर रोजी आपल्या घरात असतांना गावातीलच एका तरुणाने गुपचूपपने तिच्या घरात प्रवेश करुन तीला पाठीमागून मिठी मारून लैंगीक अनुग्रह करुन तीचा विनयभंग केला. यावर त्या महिलेने त्यास झिडकारले असता त्याने तीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी‍ दिली. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दि. 13 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 फसवणूक

उस्मानाबाद  : शिक्षक वसाहत, उस्मानाबाद येथील प्राध्यापक- ब्रिज मोहन पासवान यांचे हवाई प्रवासाचे तिकीट रद्द झाल्याने तिकीटाचा परतावा मिळण्याकामी त्यांनी इंटरनेटवर ‘मेक माय ट्रीप’ या संस्थेचा संपर्क क्रमांक शोधला. त्या संपर्क क्रमांकाची सत्यता न पडताळता पासवान यांनी त्या भ्रमणध्वनी क्रमांकावर दि. 12 सप्टेंबर रोजी संपर्क साधला असता समोरील अज्ञाताने पासवान यांना त्यांचे बँक खाते, पासवर्ड, डेबीटकार्ड क्रमांक यांसह भ्रमणध्वनीवर आलेला ओटीपी संदेश इत्यादी गोपनीय माहिती विचारली. यावर सारासार विचार न करता पासवान यांनी त्या अज्ञातास ती माहिती सांगितली असता पासवान यांच्या बॅंक खात्यातील 69,590 ₹ रक्कम अन्यत्र स्थलांतरीत झाली. अशा मजकुराच्या ब्रिज पासवानयांनी दि. 13 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहान

उमरगा : मसन जोगी वस्ती, उमरगा येथील रवि व विकी भारती या दोघा भावांत दि. 13 सप्टेंबर रोजी 19.00 वा. सु. कौटुंबिक कारणातून वाद झाला. यात विकी याने रवि यास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ढकलून दिल्याने ते जमीनीवर पडले. अशा मजकुराच्या रवि यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web