उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी, विनयभंग , मारहाण आदी गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

नळदुर्ग  : नागनाथ व्यंकटराव कदम, रा. जळकोट, ता. तुळजापूर यांच्या जळकोट गट क्र. 763 मधील शेतातील शेडचा कडी- कोयंडा अज्ञाताने दि. 25- 26 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री तोडून आतील 30 क्विंटल सोयाबीन चोरुन नेली. अशा मजकुराच्या नागनाथ कदम यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : “कमी किंमतीत सोने देतो.” असे आमिष बाबुशा सुपनाश पवार, रॉनी बाबुशा पवार, विशाल बाबुशा पवार, आशा पवार, सर्व रा. जवळा (नि.), ता. परंडा यांनी रंगकाम करणारे रोहीत वीरेंद्रर सिंह, राजेश पवन सिंह, दोघे रा. मुंबई यांना दाखवून त्यांच्याकडून 30,000 ₹ रक्कम घेउन मोबदल्यात 3 ग्रॅम सुवर्ण दागिने दिली. यानंतर ठरल्याप्रमाणे नमूद पवार कुटूंबीयांनी त्या दोघांना दि. 26 सप्टेंबर रोजी 09.00 वा. सु. जवळा (नि.) येथील आपल्या घरी बोलावून त्या चौघांनी रोहीत व राजेश यांना चाकूचा धाक दाखवून त्या दोघांजवळील 1,11,500 ₹ रोख रक्कम, युपीआय प्रणालीद्वारे 50,000 ₹ रक्कम, 3 भ्रमणध्वनी, हातातील दोन सुवर्ण अंगठ्या व एक चांदीचे कडे असे सर्व बळजबरीने काढून घेतले. अशा मजकुराच्या रोहीत सिंह यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 420, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
विनयभंग

उस्मानाबाद  : एक 35 वर्षीय विवाहीत महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 24 सप्टेंबर रोजी 11.30 वा. सु. आपल्या घरात एकटी असतांना गावातीलच एका पुरुषाने तीच्या घरात घुसून तीला लैंगीक अनुग्रह केला. यावर त्या महिलेने आरडा-ओरड करताच त्याने तीला शिवीगाळ करुन घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीला ठार मारण्याची धमकी‍ दिली. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दि. 26 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 354, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मारहाण 

उस्मानाबाद  : साईबान्ना चंदन्ना क्षिरसागर, रा. उस्मानाबाद व त्यांची मुलगी- अनुष्का असे दोघे दि. 26 सप्टेंबर रोजी 15.30 वा. सु. उस्मानाबाद येथील फुडमॉल हॉटेल येथे गेले होते. दरम्यान उस्मानाबाद येथील रहिवासी- स्वप्नील शिंदे, अनिल शिंदे, संदिप, महेश, ज्ञानेश्वर, सौरभ अशा सहाजणांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणारुन साईबान्ना यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, हातातील कड्याने मारहान करुन जखमी केले. यावेळी अनुष्का ही वडीलांस होत असलेल्या मारहानीचे भ्रमणध्वनीद्वारे छायाचित्रण करत असतांना नमूद लोकांनी तीझ्या हातातील भ्रमणध्वनी घेउन फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या साईबान्ना क्षिरसागर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 149, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web