उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी, विनयभंग, मारहाण आदी गुन्हे दाखल 

 
Osmanabad police
चोरी

तामलवाडी : किशोर वसंत जाधव, रा. देवकुरळी, ता. तुळजापूर यांनी त्यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 4068 ही दि. 17 सप्टेंबर रोजी 17.30 ते 18.30 वा. दरम्यान त्यांच्या शेताजवळील देवकुरळी ते कुंभारी रस्त्याकडेला लावली असता ती अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या किशोर जाधव यांनी दि. 18 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत धोत्री गावातील सुग्रीव दिगंबर गोडसे व त्यांच्या शेजारील एका घराचे कुलूप अज्ञाताने दि. 17- 18 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री तोडून गोडसे यांच्या घरातील 4,000 ₹ रोख रक्कम  आणि त्यांच्या शेजाऱ्याच्या घरातील 4 साड्या व 13,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुग्रीव गोडसे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : कन्हैयालाल भगवान जंत्रे, रा. पळसप, ता. उस्मानाबाद यांच्या गावशिवारातील खडी क्रशर केंद्रासमोर लावलेले टिप्पर क्र. एम.एच. 23 डब्ल्यु 0319 हा दि. 18 सप्टेंबर रोजी पहाटे 03.40 वा. सु. अज्ञाताने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या कन्हैयालाल जंत्रे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
विनयभंग

कळंब  : एका गावातील एक 15 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) 17 सप्टेंबर रोजी 14.00 वा. सु. तीच्या राहत्या घरी असतांना गावातीलच एका तरुणाने तीच्या घरासमोर येउन आरडा-ओरड करुन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तीच्या घरात घुसून त्या मुलीसोबत सलगी करण्याचा प्रयत्न करुन तीचा विनयभंग केला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या पालकांनी दि. 18 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 354 सह पोक्सो कायदा कलम- 8, 12 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मारहाण 

उमरगा : वागदरी, ता. उमरगा येथील मारुती व बिभीषण रावसाहेब भासले या दोघा भावांत कौटुंबीक कारणावरुन दि. 17 सप्टेंबर रोजी 22.30 वा. सु. राहत्या घरी वाद झाला. यात बिभीषण भोसले यांनी मारुती यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन दाढींच्या ब्लेडने हातावर, नाकावर वारकरुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मारुती भोसले यांनी दि. 18 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web