उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी, अपहरण, मारहाण आदी गुन्हे दाखल
उस्मानाबाद : रामचंद्र भुजंग बोंदर, रा. कायापुर, ता. उस्मानाबाद यांनी त्यांच्या घरासमोर ठेवलेली 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप दि. 27- 28 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या रामचंद्र बोंदर यांनी दि. 02 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अपहरण
उमरगा : उमरगा तालुक्यातील एक 14 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 01 ऑक्टोबर रोजी दुपारी राहत्या घरातून बेपत्ता झाली. यावरुन तीचे कोणी अज्ञाताने अज्ञात कारणासाठी अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या संबंधीत मुलीच्या आईने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
तामलवाडी : सावरगाव येथील दादाराव मगर यांची गुरे शेजारच्या राजेश माने यांच्या शेतात जाण्याच्या व राजेश माने यांची कुत्रे दादाराव यांच्या शेतात जाण्याच्या वादातून दादाराव, महेश, अमर, संतोष, राहुल मगर यांनी दि. 02 ऑक्टोबर रोजी 11.00 वा. सावरगाव येथील त्यांच्या शेतात अशोक व राजेश माने या पिता- पुत्रांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. अशा मजकुराच्या राजेश माने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 143, 147 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : मांडवा येथील पंडीत देशमुख हे दि. 02 ऑक्टोबर रोजी गावातील बस थांब्याजवळ बसलेले होते. यावेळी भाऊबंद- हनुमंत याने जुन्या वाद उकरुन काढून बाजूच्या बांधकामावरील गज पंडीत यांच्या डोक्यात मारुन त्यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पंडीत देशमुख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.