उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी, अपहरण, मारहाण आदी गुन्हे दाखल 

 
Osmanabad police
चोरी

शिरढोण  : शहाजी जंगली शेळके, रा. खामसवाडी, ता. कळंब यांनी त्यांचा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएस 7751 हा गावातील तडवळा रस्त्यालगत लावला असता दि. 19- 20 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री त्या ट्रॅक्टरची पुढील दोन्ही चाके व स्टेअरींग सिट अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या शहाजी शेळके यांनी दि. 21 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

तामलवाडी : ठेकेदार- अप्पु हुदप्पा खुबसद, रा. सातारा व विठ्ठल एलगौड गौर, रा. सालोटगी, ता. इंडी, जि. विजापूर या दोघांत जुन्या आर्थिक व्यवहारावरुन वाद आहे.  अप्पु खुबसद यांनी माळुंब्रा येथील 33 के.व्ही. विद्युत उपकेंद्राचे काम घेतले असून त्या ठिकाणी आनंद परशुराम गोळसंगी, रा. मुघळखोड, ता. रायबान, जि. बेळगाव हे पर्यवेक्षक म्हणुन काम पाहत असुन तेथे 7- 8 कामगार आहेत. विठ्ठल गौर यांनी दि. 19 सप्टेंबर रोजी 15.00 वा. सु. त्या ठिकाणी जाउन बेकायदेशीर जमाव जमवून अप्पु खुबसद यांच्या सोबतच्या आर्थिक व्यवहारावरून पर्यवेक्षक गोळसंगी व कामगार- मुकेशराम धनीराम, रा. झारखंड या दोघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच त्या दोघांना जबरदस्तीने क्रुझर गाडी क्र. के.ए. 28 एन 5561 मध्ये बसवून त्यांचे उपहरन केले व अप्पु खुबसद यांना, “माझे पैसे न दिल्यास या दोघांना सोडणार नाही.” अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या अप्पु खुबसद यांनी दि. 21 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 364 (अ), 365, 385, 504, 506, 143, 147 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

परंडा  : हनुमंत श्रीधर पाटील, रा. लोणी, ता. परंडा यांच्या शेतातील पावसाचे पाणी गावकरी- अमोल पोपट मटकर यांच्या शेतात येत असल्याने दि. 20 सप्टेंबर रोजी 18.00 वा. सु. लोणी शिवारात अमोल यांनी हनुमंत यांना ते पाणी अडवण्यासाठी सांगीतले. यावर चिडून जाउन हनुमंत पाटील यांनी अमोल यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अमोल मटकर यांनी दि. 21 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web