उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी, अपहरण, मारहाण आदी गुन्हे दाखल
चोरी
तुळजापूर : हंगरगा (तुळ), ता. तुळजापूर येथील लोटस पब्लिक स्कुलच्या कार्यालयाचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 16- 17 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री तोडून आतील साहित्य अस्ताव्यस्त फेकून संगणक संच व प्रिंटरची तोडफोड करुन आर्थिक नुकसान करुन सीसीटीव्ही रेकॉर्डर चोरुन नेला. अशा मजकुराच्या संजय बाबुराव जाधव, रा. तुळजापूर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 427, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अपहरण
उस्मानाबाद : एका विवाहीत महिलेचे (नाव- गाव गोपनीय) लग्न लावण्याच्या उद्देशाने तीच्या व तिच्या पतीच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने दि. 16 सप्टेंबर रोजी 07.00 वा. सु. राहत्या घरासमोरुन एका वाहनातून तीचे अपहरन तीच्या मावशीसह परजिल्ह्यातील दोघा पती- पत्नींनी केले आहे. अशा मजकुराच्या त्या महिलेच्या पतीने दि. 17 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत तीघांसह वाहनचालकावर भा.दं.सं. कलम- 336, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
उस्मानाबाद : मुंडे गल्ली, उस्मानाबाद येथील मंगल मुंडे, मधुरा मुंडे, शोभा मुंडे, बेबी मुंडे, मोना मुंडे अशा पाचजणांनी भुखंड मोजणीच्या कारणावरुन दि. 16 सप्टेंबर रोजी 14.45 वा. सु. गल्लीतीलच सुरेखा नेहरु मुंडे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देउन काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुरेखा मुंडे यांनी दि. 17 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.