उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी, मारहाण आदी गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

उमरगा : कवठा, ता. उमरगा येथील महादेव संभाजी उबाळे यांच्या उमरगा येथील ॲटोमोबाईल दुकानाचा वरील पत्रा दि. 26.01.2022 रोजी 21.00 ते 22.10 वा. सु. अज्ञात व्यक्तीने उचकटुन दुकानातील 49,000 ₹ रक्कम चोरुन नेली असून या दुकानातीलच कामगाराने ही चोरी केली असावी  असा संशय आहे. अशा मजकुराच्या महादेव उबाळे यांनी दि. 27 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
मारहाण 

परंडा : शेतातील बाभळीचे झाड तोडण्याच्या कारणावरुन घारगाव, ता. परंडा येथील महेश रविंद्र पवार, रोहिदास पवार, अंकुश पवार या तीघांनी दि. 22.01.2022 रोजी 14.30 वा. सु. ग्रामस्थ- लताबाई दिनकर तनपुरे यांना त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहान करुन लताबाई यांना जखमी केले. अशा मजकुराच्या लताबाई तनपुरे यांनी दि. 27 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

येरमाळा : उस्मानाबाद येथील अब्दुल लतिफ हामीद सय्यद, वय 48 वर्षे हे आपल्या पत्नीसह दि. 23.01.2022 रोजी 12.05 वा. सु. पतापुर शिवारातील महामार्गाने मारुती अल्टो कार मक्र. एम.एच. 46 झेड 2192 ने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने बलेनो कार कम्र. एम.एच. 09 एफक्यु 5097 ही निष्काळजीपने चालवल्याने सय्यद चालवत असलेल्या नमूद कारला समोरुन धडकली. या अपघातात सय्यद यांसह त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या अब्दुल लतिफ सय्यद यांनी दि. 27 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 427 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                              

From around the web