उस्मानाबाद जिल्ह्यात लैंगिक छळ, अपहरण, मारहाण आदी गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : जिल्ह्यातील एक 21 वर्षीय महिलेशी (नाव- गाव गोपनीय) दि. 15- 16.10.2021 दरम्यानच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील एका पुरुषाने मदत करण्याच्या बहाण्याने जवळीक साधून तीच्यावर लैंगीक अत्याचार केले. यानंतर दुसऱ्या एका परुषाने तीला एका कलाकेंद्रावर नेउन सोडले. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दि. 02.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 341, 323, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

उस्मानाबाद  : एका 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 30.10.2021 रोजी 19.30 वा. सु. आपल्या राहत्या घरी असतांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आईने दि. 02.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मारहाण 

वाशी  : घाटनांदुर, ता. भुम येथील अरुण हनुमंत बुरुंगे यांसह त्यांच्या कुटूंबातील नवनाथ, हणुमंत, बालाजी यांचा ग्रामस्थ- सुजीत मारुती बुरुंगे यांसह त्यांच्या कुटूंबातील अविनाश, मारुती, सुरेखा यांच्याशी शेतातील बांध व पाट फोडण्याच्या कारणावरुन दि. 01.11.2021 रोजी 17.00 वा. सु. घाटनांदुर शिवारात वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन नमूद दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबातील सदस्यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने, कुऱ्हाडीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अरुण बुरुंगे व सुजीत बुरुंगे यांनी दि. 02.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 427, 323, 504, 506, 34 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.


सार्वजनिक ठिकाणी गोंधळ 

कळंब : कळंब येथील समीर मेहमुद सय्यद, आसिफ आयुब शेख या दोघांनी दि. 02.11.2021 रोजी 16.30 वा. सु. कळंब शहरात सार्वजनिक ठिकाणी आपापसात हाणामारी, शिवीगाळ करुन सार्वजनिक शांततेचा भंग करुन भा.दं.सं. कलम- 160 चे उल्लंघन केले. यावरुन पोहेकॉ- सचिन गायकवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.


अपघात

उमरगा  : चालक- सदानंद मारुती तेलंग, रा. भालकी, जि. बीदर यांनी दि. 16.10.2021 रोजी 01.00 वा. सु. तलमोड येथील रस्त्यावर कार निष्काळजीपने चालवल्याने ती रस्ता दुभाजकास जाउन धडकली. या अपघातात ते स्वत: जखमी होउन कारमधील प्रवासी- खादर अहेमद, आंबादास कोले हे जखमी झाले. अशा मजकुराच्या संगमेश्वर हाळबुंरे, रा. भालकी, जि. बीदर यांनी दि. 02.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web